गांधीनगर वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना

By Admin | Updated: May 12, 2014 17:55 IST2014-05-12T17:55:44+5:302014-05-12T17:55:44+5:30

वसगडे : गांधीनगर (ता. करवीर) येथील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलिसांच्यावतीने विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Measures for addressing Gandhinagar traffic question | गांधीनगर वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना

गांधीनगर वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपाययोजना

गडे : गांधीनगर (ता. करवीर) येथील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलिसांच्यावतीने विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
गांधीनगर ही कापडाची मोठी बाजारपेठ असल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यासह कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, आदी राज्यांतून मोठ्या संख्येने व्यापारी, ग्राहक ये-जा करत असल्याने वाढत्या वाहनामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक, सम-विषम पार्किंग यासारख्या उपाययोजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहेत.
गांधीनगर मेनरोडवर रूपसंगम साडी सेंटर ते साधु वासवानी हायस्कूलपर्यंत सर्व वाहनास नो पार्किंग झोन तसेच सकाळ प्रेसपर्यंत अवजड वाहनाव्यतिरिक्त सम तारखेस पार्किंग, गुरुनानक पेट्रोल पंप ते मंुबई गारमेंट विषम तारखेस पार्किंग तसेच वळिवडे फाट्यापासून कोल्हापूरकडे जाणार्‍या रस्त्यावर सर्व अवजड वाहनांना सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मंुबई गारमेंटपासून डाव्या बाजूने पोलीस ठाण्याकडे मार्केटकडे जाणारा रस्ता एकेरी वाहतूक करण्यात आला आहे.
सर्व नवीन उपाययोजनांची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू असून नागरिक, व्यापारी, वाहनधारकांनी काही हरकती असल्यास पंधरा दिवसांत कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
(वार्ताहर)

Web Title: Measures for addressing Gandhinagar traffic question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.