भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरबाबत केलेल्या विधानावर भारताने आता भाष्य केलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारतही प्रत्युत्तर देणार. पाकिस्तानने अनेक वर्षांपासून दहशतवादाला खतपाणी घातलं असं म्हटलं आहे.
"भारताला काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही" असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. तसेच युद्धविरामावर ट्रम्प यांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, जम्मू आणि काश्मीर हा फक्त भारत आणि पाकिस्तानमधील मुद्दा आहे. भारताच्या या धोरणात कोणताही बदल झालेला नाही आणि पाकिस्तानला पीओके खाली करावा आहे."
"आम्ही पाकिस्तानने केलेलं विधान पाहिलं आहे. ज्या राष्ट्राने औद्योगिक स्तरावर दहशतवादाला पोसलं आहे त्याने असा विचार करावा की ते परिणामांपासून वाचू शकतील, तर हे स्वतःला मूर्ख बनवत आहे. भारताने नष्ट केलेली दहशतवादी पायाभूत सुविधांची ठिकाणं केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील इतर अनेक निष्पाप लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार होती. पाकिस्तान जितक्या लवकर ते स्वीकारेल तितकं चांगलं आहे. विजयाचा दावा करणं ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. त्यांनी 1971, 1975 आणि 1999 कारगिल युद्धातही असंच केलं होतं" असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
"आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
भारताने केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही जोरदार प्रत्युत्तर देऊन आपली ताकद दाखवून दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर भारतीय हवाई दलाच्या योद्ध्यांना मोदींनी संबोधित केलं. "ज्या पाकिस्तानी सैन्यावर हे दहशतवादी अवलंबून होते त्यांना भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीयांनी पराभूत केलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला हे देखील दाखवून दिलं की पाकिस्तानमध्ये अशी कोणतीही जागा शिल्लक नाही जिथे दहशतवादी आरामात श्वास घेऊ शकतील. आम्ही घरात घुसून मारू आणि तुम्हाला पळून जाण्याची एकही संधी देणार नाही" असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.