शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासाठी वाराणसी आणि केरळ दोन्हीही सारखेच - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 14:16 IST

नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले.

तिरुवनंतपुरम - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले. मात्र दक्षिण भारतातील केरळमध्येभाजपाला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळचा दौरा करून तेथील जनतेचे आभार मानले. तसेच माझ्यासाठी केरळ हे तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढी वाराणसी आहे, जे आम्हाला निवडून देतात ते आमचे आहेत आणि ज्यांनी यावेळी आम्हाला निवडून दिले नाही, तेही आमचेच आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी केरळमध्ये दाखल झाले. त्यानंतर मोदींनी गुरुवायूर येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरात पूजा केली. यावेळी मोदींची पद्मतुला करण्यात आली. त्यानंतर सभेला संबोधित करताना मोदींनी केरळमधील जनतेचे आभार मानले.   ''जनता जनार्दन ईश्वराचे रूप आहे. ही बाब यावेळच्या निवडणुकीत देशाने पाहिली आहे. राजकीय पक्ष जनतेचा कल जाणू शकले नाहीत, पण देशातील जनतेने भाजपा आणि एनडीएच्या बाजूने मतदानाचा कौल दिला. त्यासाठी मी विनम्रपणे जनतेचे अभिवादन करतो.'' असे मोदी म्हणाले. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते निवडणुकीच्या राजकारणासाठी मैदानात उतरत नाही. आम्ही 365 दिवस जनतेच्या सेवेमध्ये व्यस्त असतो. आम्ही केवळ सरकार स्थापन करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. आम्ही देश घडवण्यासाठी राजकारणात उतरलो आहोत. जनता आम्हाला पाच वर्षांसाठी लोकप्रतिनिधी बनवते. मात्र आम्ही जनसेवक आहोत, जनप्रतिनिधी आजीवन असतात, असेही मोदींनी सांगितले.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाKeralaकेरळ