शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

मायावतींचा मोठा निर्णय, आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले; म्हणाल्या- 'मी जिवंत असेपर्यंत..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 15:25 IST

बसपच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

BSP Mayawati :उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टी (BSP) च्या प्रमुख मायावती यांनी पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. रविवारी बसपच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मायावती यांनी भाचा आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले आहे. तसेच, भाऊ आनंद कुमार यांच्याकडे आता राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय रामजी गौतम यांनाही बसपचे राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले आहे. म्हणजेच, आता बसपमध्ये दोन राष्ट्रीय समन्वयक असणार आहेत.

मी जिवंत असेपर्यंत कोणालाही उत्तराधिकारी बनवणार नाहीमायावतींच्या निर्णयानुसार आकाश आनंद यापुढे पक्षात कोणतेही पद भूषवणार नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मायावतींनी त्यांचे जुने विश्वासू आणि जवळचे मित्र अशोक सिद्धार्थ यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. ते आकाश आनंदचे सासरे आहेत. दरम्यान, मायावतींनी हयात असेपर्यंत कोणालाही आपला उत्तराधिकारी घोषित करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. माझ्या नावाचा गैरवापर करुन पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना तत्काळ हाकलून दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अशोक सिद्धार्थने आकाशची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केलीबसपा प्रमुख पुढे म्हणाल्या, आपल्याला यापुढे सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पाहावे लागेल. अशा स्थितीत पक्षाच्या चळवळीच्या हितासाठी आकाश आनंद यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. यासाठी पक्ष नाही, तर त्याचे सासरे अशोक सिद्धार्थ हे पूर्णपणे जबाबदार आहेत. त्यांनी पक्षाचे नुकसान केले, आकाश आनंदची राजकीय कारकीर्दही बिघडवली आहे. त्यांच्या जागी आनंद कुमार पूर्वीप्रमाणेच पक्षाची सर्व कामे करत राहतील, असे मायावतींनी स्पष्ट केले.

बहुजन समाज पक्षाच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, राजस्थान, महाराष्ट्र यासह अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. पक्षसंघटना मजबूत व्हावी, जनाधार वाढावा यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पण, या बैठकीला मायावती यांचे पुतणे आकाश आणि ईशान उपस्थित नव्हते. 

गेल्या वर्षी आकाशला मोठा धक्का दिलेलाबसपा सुप्रिमोने डिसेंबर 2023 मध्ये आकाश आनंदला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. पण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींनी आपला निर्णय मागे घेतला. मे महिन्यात त्यांनी त्यांचा आकाश आनंद याला बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय समन्वयक आणि उत्तराधिकारी पदावरून हटवले. आकाश आनंद पूर्ण परिपक्व होईपर्यंत त्याला दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात येईल, असे त्या म्हणाल्या होत्या.

 

टॅग्स :mayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेश