मायावती यूपीतल्या गुंड, निवडणुकीनंतर तुरुंगात जातील, भाजपा खासदाराचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 13:27 IST2019-05-04T13:24:42+5:302019-05-04T13:27:15+5:30

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, राजकीय नेतेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत.

Mayawati will go to jail after the UP gangrape, elections, BJP MP's statement | मायावती यूपीतल्या गुंड, निवडणुकीनंतर तुरुंगात जातील, भाजपा खासदाराचं विधान

मायावती यूपीतल्या गुंड, निवडणुकीनंतर तुरुंगात जातील, भाजपा खासदाराचं विधान

नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, राजकीय नेतेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यादरम्यान केसरगंजचे भाजपा खासदार आणि उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांना उत्तर प्रदेशातली सर्वात मोठी गुंड असल्याचं म्हटलं आहे. निवडणुकीनंतर मायावती तुरुंगाची हवा खातील, असंही ते म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मायावतींनी केसरगंजमध्ये महागठबंधनचे बसपाचे उमेदवार चंद्रदेव राम यादव यांच्यासाठी निवडणूक सभा घेतली होती. त्या सभेत मायावतींनी बृजभूषण यांच्यावर टीका केली होती.

तसेच बृजभूषण माफिया आणि गुंडा असल्याचं मायावती म्हणाल्या होत्या. त्यावर बृजभूषण यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मायावतींनी गोंडामधल्या एक रॅलीदरम्यान मला गुंडा म्हटलं आहे. मला असं वाटतं की त्या स्वतःच गुंड आहेत. त्यांनी मला निवडणुकीनंतर जेलमध्ये घालण्याची धमकी दिली आहे. परंतु निवडणुकीनंतर त्या स्वतःच जेलमध्ये जातील, असंही बृजभूषण म्हणाले आहेत.


खरं तर मायावतींनी बसपा उमेदवार चंद्रदेव राम यादव यांच्यासाठी निवडणूक रॅलीला संबोधित केलं होतं. या दरम्यान भाजपाचे उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर टीका करताना योगी सरकार आणि मोदी सरकारवही हल्लाबोल केला आहे. नमो नमोचा खेळ आता संपला आहे. त्यामुळे निवडणुकीत मोदींचं नाटक चालणार नाही, असंही मायावती म्हणाल्या आहेत.  

Web Title: Mayawati will go to jail after the UP gangrape, elections, BJP MP's statement