शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 14:54 IST

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.

ठळक मुद्देमायावती यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांच्यावर टीकास्त्रसर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक काRSS वर निशाणा साधत केला सवाल

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मोहन भागवत यांनी ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचे काम केल्याचे म्हटले आहे. यावरून अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत मोहन भागवत आणि RSS वर टीकास्त्र सोडले आहे. यातच आता बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला असून, सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का, असा सवाल केला आहे. (mayavati criticized rss and mohan bhagwat over muslim hindu same ancestors statement)

“उद्धव ठाकरेंसह १२ जणांचे घोटाळे दिवाळीपर्यंत उघड करणार”; भाजपचा इशारा

उत्तर प्रदेशमध्ये आगामी काही महिन्यांत विधानसभा निवडणुका असून, जवळपास सर्वच पक्षांची मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यामध्ये भाजप आघाडीवर असून, जागा कमी झाल्या तरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सत्ता राखण्यात यशस्वी होतील, असा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. दुसरीकडे मायावती यांचा बसप प्रबुद्ध संमेलनाच्या माध्यमातून ब्राह्मण कार्ड वापरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यातच ब्राह्मणांची सुरक्षितता, सन्मान आणि प्रगतीचे आश्वासन मायावतींनी दिले असून, मुस्लिम बांधवांना काँग्रेस आणि समाजवादी पक्षापासून सावध राहण्यास सांगितले आहे. यातच मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर टीका करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 

“…तर तालिबानने जावेद अख्तर यांना चौकात फटके मारले असते”; भाजपचे टीकास्त्र

मुस्लिम बांधवांना सावत्रपणाची वागणूक कशासाठी?

भारतात हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच असतील, तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम बांधवांना सावत्रपणाची वागणूक कशासाठी देतात, असे विचारत संघ आणि भाजपवाल्यांचे ओठावर एक आणि पोटात एक असाच व्यवहार असतो, असे टीकास्त्र सोडले आहे. यापूर्वी डीएनए बाबत केलेल्या वक्तव्यावरूनही मायावती यांनी संघ आणि भाजपवर निशाणा साधला होता. 

“काँग्रेससह सप-बसपला मतदान करणे म्हणजे पाप, त्यांना मंदिरा जायलाही भीती वाटते”: भाजप

नेमके काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत?

भारतात हिंदूंसोबत राहिलं तर काहीच मिळणार नाही. फक्त हिंदूंचीच निवड केली जाईल आणि इस्लाम धर्म संपुष्टात येईल असा गैरसमज ब्रिटिशांनी मुस्लिम नागरिकांमध्ये निर्माण केला. यातूनच हिंदू-मुस्लिम यांच्यात शत्रुत्व निर्माण करण्याचे काम ब्रिटिशांनी केले. ब्रिटिशांनी भारतात एक गैरसमजूतीचे वातावरण निर्माण केले. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल अशी माहिती पसरवली. वेगळ्या राष्ट्राच्या मागणीसाठी त्यांनी मुस्लिमांना प्रवृत्त केले. इस्लाम धर्म भारतातून नष्ट होईल असे सांगितले गेले. पण तसे झालंय का? तर नाही. मुस्लिमांना आज सर्व स्तरांमध्ये हक्काचे स्थान आहे, असे मोहन भागवत म्हणाले.  ब्रिटिशांना जे हवे होते ते त्यांनी त्यावेळी साध्य केले. दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवला आणि फोडाफोडी केली. आपल्याला आपला दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. भारतीय हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वच एकच होते. प्रत्येक भारतीय हा हिंदूच आहे, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतmayawatiमायावतीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण