मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:56 AM2024-01-16T11:56:36+5:302024-01-16T11:57:34+5:30

मथुरातील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाला सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे.

Mathura, Shahi Eidgah will not be surveyed; The Supreme Court stayed the order of the High Court | मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती

मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती

सुप्रीम कोर्टाने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाला झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणात शाही ईदगाहचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयीन आयुक्त नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराशेजारील शाही ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणास मान्यता दिली होती, त्याविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम बाजूच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरूच राहील, पण सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयीन आयुक्तांच्या नियुक्तीला अंतरिम स्थगिती दिली जाईल. 

PM मोदी ॲक्शन मोडमध्ये! भाजपा सरकार असलेल्या राज्यातील मंत्र्यांची बैठक घेणार

सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षावर प्रश्न उपस्थित केले आणि सांगितले की, तुमचा अर्ज स्पष्ट नाही. तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगावे लागेल. याशिवाय बदलीचे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावरही निर्णय घ्यायचा आहे.

सर्वेक्षणाची केली होती मागणी

शाही ईदगाहमध्ये सर्वेक्षणाच्या मागणीसाठी वकील हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभास पांडे आणि देवकी नंदन या वकीलांमार्फत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात त्यांनी ASI सर्वेक्षणाची मागणी केली होती.

या याचिकेत दावा करण्यात आला आहे की, भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान मशिदीच्या खाली आहे आणि मशीद हिंदू मंदिर असल्याचे अनेक चिन्हे आहेत. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, याचिकेत अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आले होते की, तेथे कमळाच्या आकाराचा स्तंभ आहे जो हिंदू मंदिरांचे वैशिष्ट्य आहे.

Web Title: Mathura, Shahi Eidgah will not be surveyed; The Supreme Court stayed the order of the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.