शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

मुस्लीम डोसा विक्रेत्याने गाड्याला हिंदू नाव दिल्याने तोडफोड, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 14:02 IST

मथुरा येथील विकास बाजारातील ही घटना असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ शेअर करणारा देविराज पंडित हाच या गर्दीचे नेतृत्व करत असल्याचं दिसून येत आहे.

ठळक मुद्देया घटनेप्रकरणी मथुरा पोलिसांनी माहिती दिली आहे. डोसा विक्रेत्याच्या दुकानाच्या नावावरुन हा वाद झाला आहे. काही लोकांनी डोसाविक्रेत्याला शिवीगाळ केली आहे.

मुंबई - सोशल मीडियावर सध्या वेगाने एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, मुथरा येथील विकास बाजारचा हा व्हिडिओ असून एका मुस्लीम डोसा विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. डोसा विक्रेता श्रीनाथ नावाने आपले डोसा विक्रीचे दुकान चालवत आहे. देविराज पंडित नावाच्या एका फेसबुक युजर्संने एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, जमावाकडून डोसा विक्रेत्याच्या दुकानाची तोडफोड करण्यात आल्याचे दिसून येते. 

मथुरा येथील विकास बाजारातील ही घटना असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ शेअर करणारा देविराज पंडित हाच या गर्दीचे नेतृत्व करत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती यह श्रीनाथ डोसा है... असे म्हणत असून दुसरा व्यक्ती मुस्लीम डोसा विक्रेत्याला त्याचं नाव विचारत आहे. तू हिंदू नाव असलेल्या श्रीनाथजींच्या नावाने आपलं दुकान का चालवतो?, असा प्रश्न डोसा विक्रेत्याला विचारला जात आहे. त्यावेळी, आणखी एक व्यक्ती डोसा विक्रेत्याला जमजावून सांगताना दिसत आहे. त्यामध्ये, तुम्ही हिंदू नाव लावून का दुकाना चालवता, ते नाव पाहूनच हिंदू धर्मीय लोक इच्छा नसतानाही येथे खायला येतात, असे त्याने म्हटले आहे. 

दरम्यान, या घटनेप्रकरणी मथुरा पोलिसांनी माहिती दिली आहे. डोसा विक्रेत्याच्या दुकानाच्या नावावरुन हा वाद झाला आहे. काही लोकांनी डोसाविक्रेत्याला शिवीगाळ केली आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या, पोलीस तपास सुरू असून संबंधित व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :mathura-pcमथुराMuslimमुस्लीमViral Photosव्हायरल फोटोज्