शेतीच्या वादातून मामाचा भाच्याकडून खून
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:41+5:302015-03-14T23:45:41+5:30
औरंगाबाद : जटवाडा शिवारात जमिनीच्या वादातून दोन नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाच्याकडून मामाचा खून झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शेतीच्या वादातून मामाचा भाच्याकडून खून
औ ंगाबाद : जटवाडा शिवारात जमिनीच्या वादातून दोन नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाच्याकडून मामाचा खून झाला. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.विश्वास आसाराम शिंदे (५८, रा. सिडको एन-३) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर या घटनेत आरोपी संजय शंकर भालेकर (४०, रा. ओव्हर) हे जखमी झाले आहेत. याविषयी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मृत आणि आरोपी यांच्यात मामा-भाचे असे नाते आहे. विश्वास शिंदे यांची जटवाडा शिवारात जमीन आहे. या जमिनीशेजारी आरोपीची जमीन आहे. त्यांच्यात जमिनीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यांचा हा वाद तंटामुक्त समितीपर्यंत गेला होता, त्यावेळी पाच गुंठे जमीन संजयला देण्याची तयारी विश्वास शिंदे यांनी दर्शविली होती. मात्र, त्यानंतरही संजय यांना जमीन मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढत गेला. दरम्यान, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास शिंदे हे शेतात गेले होते. दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास आरोपीसोबत त्यांचे भांडण सुरू झाले. त्यांच्यात आपसात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत दोघेही जखमी झाले. मात्र, शिंदे यांना गंभीर दुखापत झाल्याने भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी त्यांना घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना सायं. ४.१५ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. तर संजय हे हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. पोलिसांनी त्यांना काही वेळ ठाण्यात बसवून शांत केले आणि नंतर मेडिकल मेमो देऊन घाटीत पाठविले. संजय हे घाटीत आल्यानंतर तेथे त्यांना शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे समजले. तेथून ते फरार झाले. दरम्यान, ही बाब पोलिसांना कळताच पोलिसांनी त्यास रात्री उशिरा पकडून ठाण्यात आणले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.