शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाने बनवला 'हा' मास्टरप्लान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 09:52 IST

कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बंगळुरू - कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करता न आल्याने कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार मंगळवारी कोसळले. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, नव्या सरकारच्या स्थापनेच्या मार्गात कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी भाजपाने मास्टरप्लान तयार केला आहे. त्यामुळे सध्या मुंबईत तळ ठोकून असलेले काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरच बंगळुरू येथे परतणार आहेत.   कुमारस्वामी सरकार बहुमत मिळवण्यात अपयशी ठरल्याने बंडखोर आमदार खूप आनंदी असल्याचा दावा भाजपामधील सूत्रांनी केला आहे. बंडखोरांना जे हवे होते ते मिळाले आहे. आता हे आमदार येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंत बंगळुरूमध्ये माधारी येतील. दरम्यान, आपली बंडखोरी आणि सरकारचा पाठिंबा काढून घेण्यामागे भाजपाचा हात असल्याचे वृत्त संबंधित बंडखोर आमदारांनी फेटाळून लावले होते.  सरकार स्थापन करण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी मध्यरात्री भाजपाच्या आमदारांची बैठक येडियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली एका हॉटेलमध्ये झाली होती. आज पुन्हा 11 वाजता भाजपा आमदारांची बैठक होणार आहे. तसेच येडियुरप्पांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांना पत्र लिहून समर्थन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सदानंद गौडा यांनी येडियुरप्पाच कर्नाटकत भाजपाचे मुख्यमंत्री असतील, असं स्पष्ट केलं आहे. भाजपा नेते जगदीश शेट्टार म्हणाले, आमच्याकडे 105 आमदारांचं संख्याबळ आहे. सभागृहात बहुमत असल्यानं आम्ही सरकार बनवणार आहोत. तसेच काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामे अद्याप कर्नाटकातल्या विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारलेले नाहीत. आता ते भाजपाबरोबर जातात की नाही, येत्या काळात समजणार आहे.

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा