मस्ट- इंद्राणी पॅकेज -सावत्र भावासोबत प्रेम केल्याची मोजली किंमत? इंद्राणी, पीटर मुखर्जींना खटकत होते संबंध पोलिसांना ऑनर किलींगचा दाट संशय
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30
सावत्र भावासोबत प्रेम केल्याची मोजली किंमत?

मस्ट- इंद्राणी पॅकेज -सावत्र भावासोबत प्रेम केल्याची मोजली किंमत? इंद्राणी, पीटर मुखर्जींना खटकत होते संबंध पोलिसांना ऑनर किलींगचा दाट संशय
स वत्र भावासोबत प्रेम केल्याची मोजली किंमत?इंद्राणी, पीटर मुखर्जींना खटकत होते संबंधपोलिसांना ऑनर किलींगचा दाट संशय मुंबई - शीना बोहरा हत्येबाबत अनेक तर्कवितर्क सध्या सुरू आहेत. शीना आणि राहुल मुखर्जी यांच्यातील प्रेमसंबंध हा त्यापैकीच एक. शीना ही इंद्राणी व तिचे पहिले पती सिद्धार्थ दास यांची मुलगी होती. तर राहुल हा इंद्राणीचे तिसरे पती पीटर मुखर्जी यांचा त्यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा होता. २००२मध्ये पीटर आणि इंद्राणी यांनी विवाह केला. त्यानंतर शीना जसजशी मोठी होऊ लागली तसतशी इंद्राणी ही माझी बहिण अशी तिची सर्वांशी ओळख करून देऊ लागली. त्यामुळे इंद्राणी व शीना या बहिणी असल्याचाच आजतागायत बहुतांश लोकांचा समज होता. हत्येच्या काही काळाआधी शीना व राहुल यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. दोघे वांद्रे व मालाड येथील निवासस्थानी काही काळासाठी सोबतही राहात होते. शीना व राहुल ही सावत्र भावंडे होती. त्यामुळे ही बाब इंद्राणी व पीटर या दोघांना खटकत होती. सूत्रांच्या माहितीनुसार यावरून दोघांनी शीना व राहुल यांचे कानही उपटले होते. शीनाची हत्या झाल्याची माहिती मंगळवारी खार पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर पुढे आली. बुधवारी या प्रकरणाबाबत पीटर यांनी यांनी आपली बाजू माध्यमांसमोर मांडली. शीना ही इंद्राणीची मुलगी होती हे मला आज समजले. आतापर्यंत मी तिला इंद्राणीची धाकटी बहिणच समजत होतो. मीच तिला मुंबईच्या सेंट झेव्हीअर महिविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी मदत केली होती. इंद्राणीने वेळोवेळी दिलेल्या माहितीनुसार शीना गेल्या तीन वर्षांपासून परदेशात शिक्षण घेते आहे, असे मला वाटत होते. मी फेसबूकवर नाही. पण इंद्राणी अधून मधून मला शीनाचे परदेशातील फोटो दाखवे. मीही त्यावर विश्वास ठेवला. पीटर पुढे म्हणाले, शीना व माझा मोठा मुलगा राहुल यांच्यात प्रेमसंबंध होते व आम्हा दोघांचा(इंद्राणचाही) त्याला प्रखर विरोध होता. शीना व राहुल काही केल्या विलग होत नाहीत, होणार नाहीत ही खात्री पटल्याने इंद्राणीने तिच्या हत्येचाच कट आखला असावा, असा अंदाज आतापर्यंतच्या तपसातून पोलीस वर्तवतात. एका वरिष्ठ अधिकार्याने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार ऑनर किलींगच्या दृष्टीकोनातूनही तपास करत आहोत.नावावरील मालमत्तेने शीनाचा केला घात?दुसरा पती संजय खन्नालाच का सोबत घेतले?मुंबई - इंद्राणी व पीटर मुखर्जी यांनी स्टार टीव्ही सोडून २००९मध्ये स्वत:ची आयएक्सएन वाहिनी सुरू केली. काही वर्षांनी ही वाहिनी त्यांनी तिसर्याला विकली. त्यातून आलेल्या पैशांमधून या दाम्पत्याने देशभरात बरीच मालमत्ता विकत घेतली. यापैकी मोठा वाटा शीनाच्या नावे आसाममध्ये विकत घेतलेल्या मालमत्तेचा होता. याच मालमत्तेच्या वादातून शीनाची हत्या तर झाली नाही ना, याचाही तपास खार पोलीस करत आहेत. शीनाची हत्या करण्यासाठी इंद्राणीने दुसरा पती संजय खन्ना याला का सोबत घेतले आणि तोही या हत्याकांडात का सहभागी झाला, याचेही नेमके उत्तर अद्याप खार पोलिसांकडे नाही. इंद्राणीला संजय खन्नापासून एक मुलगी झाली. तिचे नाव विधी. ती सध्या लंडनमध्ये असते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटस्फोटानंतर पीटर व इंद्राणीने तिला दत्तक घेतले होते.इंद्राणीने आपली बरीचशी मालमत्ता शीनाच्या नावे केली होती. मात्र शीना सज्ञान झाल्यानंतर याच मालमत्तेवरून दोघींचे खटके उडू लागले. सूत्रांच्या माहितीनुसार आपल्या नावे असलेली मालमत्ता इंद्राणीला परत करण्यास शीनाने कडाडून विरोध केला होता. ती परत मिळविण्यासाठीही हे हत्याकांड घडले असावे, असाही पोलिसांचा अंदाज आहे.शीनाची हत्या केल्यानंतर तिच्या नावे असलेली मालमत्ता ही संजयची मुलगी विधीच्या नावावर चढवून हळूहळू आपल्याकडे घेण्याचा डाव इंद्राणीच्या मनात सुरू असावा, अशीही शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.इंद्राणीचे फॅमिली ट्री- इंद्राणीचा पहिला विवाह आसाम, गुवाहाटीत चहाच्या मळयांचे मोठे व्यावसायिक असलेल्या सिद्धार्थ दास यांच्यासोबत झाला. या दाम्पत्याला शीना व मिखाईल अशी दोन अपत्ये झाली. दास यांना घटस्फोट दिल्यानंतर इंद्राणीने संजय खन्ना यांच्याशी लग्न केले. इंद्राणीला खन्ना यांच्यापासून झालेली विधी ही मुलगी सध्या ती लंडनमध्ये असते.खन्ना यांना घटस्फोट दिल्यानंतर इंद्राणीने पीटर मुखर्जींशी विवाह केला. इंद्राणी ही पीटर यांची दुसरी पत्नी आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शबनम आहे. पीटर व शबनम यांना रॉबीन व राहुल अशी दोन अपत्ये आहेत. ............................................मलाही भाऊ म्हणून वागवलेइंद्राणी म्हणजेच आईने शीनासोबत मलाही भावासारखेच वागवले. सर्वांना माझी ओळख धाकटा भाऊ म्हणून करून दिली, असा आरोप मिखाईल दास याने केला. मिखाईल हा इंद्राणी व सिद्धार्थ दास यांचा मुलगा आहे. त्याने केलेल्या आरोपांनुसार शीना व मला बर्याच वर्षांनी इंद्राणी ही आमची आई आहे हे समजले. आम्हा दोघांचे संगोपन आमच्या आजी-आजोबांनीच केले. .........................................शीनाच्या मृतदेहाचे फक्त फोटोचअवशेषांची विल्हेवाट कधीच लागलीमुंबई - मे २०१२मध्ये पेण पोलिसांना खोपोली मार्गावरील गागोदे गावातील जंगलात शीनाचा मृतदेह सापडला होता. मात्र तो ७० टक्के भाजला होता. पोलिसांनी काही दिवसांनी या मृतदेहाची विल्हेवाट लावली. आताच्या घडीला मृतदेहाच्या ४ फोटोंव्यतिरिक्त पोलिसांच्या हाती काहीही नाही. त्यामुळे तो मृतदेह शीनाचाच होता हे न्यायालयाला पुराव्यांनीशी पटवून देण्यात मुंबई पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागेल.तज्ञांकडे नमूने नाहीतमुंबई न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील उच्चपदस्थ सूत्रांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार अद्याप खार पोलिसांनी या हत्येशी संबंधीत एकही नमुना तपासणीसाठी धाडलेला नाही.