शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 19:24 IST

Kuwait Fire: कुवेतमध्ये मजुरांच्या इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला.

Kuwait Fire:  दक्षिण कुवेतमध्ये एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४० भारतीयांचा मृत्यू झाला. या भीषण आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाली. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत मजूर राहत होते. त्यातील बहुसंख्य हे भारतीय होते. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत परराष्ट्र मंत्र्‍यांना कुवेतला जाण्याचे आदेश दिले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेत काही लोकांचा मृत्यू आगीमुळे झाला. तर धुरामुळे गुदमरून मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

कुवेतमध्ये एका बहुमजली इमारतीला लागलेल्या आगीत ४० भारतीय नागरिकांसह ४१ लोकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अल-मंगफ नावाच्या इमारतीत ही आग लागली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल सांगितले की मृतांमध्ये बहुतांश भारतीय नागरिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे चारच्या सुमारास ही भीषण आग लागली. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत मोठ्या संख्येने भारतीय मजूर राहत होते.

या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह कुवेत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. आगीच्या घटनेत जखमी झालेल्यांना मदतीची देखरेख करण्यासाठी आणि मृतांचे मृतदेह त्वरीत परत आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह तात्काळ कुवेतला रवाना झालेत.

पहाटे चार वाजता मजूर झोपलेले असताना आग लागल्याने अपघातातील मृतांचा आकडा वाढला. अचानक लागलेल्या आगीमुळे लोकांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही आणि झोपेतच त्यांचा जीव गुदमरला. ही इमारत एनबीटीसी ग्रुप नावाच्या कंपनीने घेतली असून त्यात १९५ कामगार राहत होते. यातील बहुतांश लोक हे केरळ, तामिळनाडू आणि काही उत्तर भारतीय राज्यांतील होते.

"कुवेतमधील कामगारांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत केरळवासीयांसह ४० हून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याने धक्का बसला आहे आणि शोक व्यक्त केला आहे. शोकाकुल कुटुंबियांबद्दल माझे मनःपूर्वक संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :fireआगAccidentअपघातNarendra Modiनरेंद्र मोदीsaudi arabiaसौदी अरेबिया