शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

आसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीत भीषण आग, NDRFची टीम घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 19:10 IST

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बगजानमधील ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली. दोन आठवड्यांपासून येथील विहिरीतून सतत गॅसगळती सुरू होती, त्यानंतर आज मंगळवारी प्रचंड आग लागली. आगीमुळे सातत्याने विहिरीतून धूर बाहेर पडत होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, 'ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीत इतका भीषण स्फोट झाला की, दोन किलोमीटरच्या अंतरावरून तो स्पष्ट दिसू शकत होता. आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेले नाहीत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याच वेळी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ट्विट करून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी घटनेबाबत चर्चा केली असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, 'आम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, सैन्य आणि पोलीस अधिकारी तैनात करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनालाही लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्थानिक नागरिकांनी घाबरू नका, असे आवाहन केले. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने जवळपासचे ग्रामस्थ व स्थानिकांनाही घटनास्थळावरून बाहेर काढले आहे.