आसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीत भीषण आग, NDRFची टीम घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 19:10 IST2020-06-09T19:02:34+5:302020-06-09T19:10:02+5:30

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

massive fire at the gas well of oil india ltd at assam | आसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीत भीषण आग, NDRFची टीम घटनास्थळी

आसाममध्ये ऑइल इंडिया लिमिटेडच्या गॅस विहिरीत भीषण आग, NDRFची टीम घटनास्थळी

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील बगजानमधील ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीला भीषण आग लागली. दोन आठवड्यांपासून येथील विहिरीतून सतत गॅसगळती सुरू होती, त्यानंतर आज मंगळवारी प्रचंड आग लागली. आगीमुळे सातत्याने विहिरीतून धूर बाहेर पडत होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)ची टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, 'ऑईल इंडिया लिमिटेडच्या गॅसच्या विहिरीत इतका भीषण स्फोट झाला की, दोन किलोमीटरच्या अंतरावरून तो स्पष्ट दिसू शकत होता. आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेले नाहीत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिका-यांनी सांगितले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.



त्याच वेळी आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ट्विट करून पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी घटनेबाबत चर्चा केली असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, 'आम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, सैन्य आणि पोलीस अधिकारी तैनात करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत. तसेच जिल्हा प्रशासनालाही लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्थानिक नागरिकांनी घाबरू नका, असे आवाहन केले. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने जवळपासचे ग्रामस्थ व स्थानिकांनाही घटनास्थळावरून बाहेर काढले आहे.

Web Title: massive fire at the gas well of oil india ltd at assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.