वडोदराच्या IOCL रिफायनरीत स्फोटानंतर भीषण आग; बचावकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 19:14 IST2024-11-11T19:13:55+5:302024-11-11T19:14:47+5:30
गुजरातमधील वडोदरा येथील कोयली भागातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत सोमवारी झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. आगीमुळे धुराचे लोट काही किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते.

वडोदराच्या IOCL रिफायनरीत स्फोटानंतर भीषण आग; बचावकार्य सुरू
गुजरातमधील वडोदरा येथील कोयली भागातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत सोमवारी झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. आगीमुळे धुराचे लोट काही किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते. स्फोटानंतर रिफायनरीत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.
गुजरातमधील वडोदरा येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या रिफायनरीमध्ये स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली. डीसीपी वाहतूक ज्योती पटेल यांनी सांगितले की, बचावकार्य सुरू आहे. अद्याप जीवितहानीची किंवा गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
मणिपूरमध्ये सीआरपीएफची मोठी कारवाई; पोलीस ठाण्यावर हल्ला करणारे ११ अतिरेकी ठार
आमदार धर्मेंद्र सिंह वाघेला म्हणाले, “मला बाजवाचे सरपंच अजित पटेल यांचा फोन आला. त्यांनी रिफायनरीला लागलेल्या आगीची माहिती दिली. रिफायनरीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आग आटोक्यात आणण्याचे कामात त्यांचा सहभाग असल्याने मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलू शकलो नाही. सुदैवाने, मृत्यूची नोंद झालेली नाही.
पीटीआयच्या वृत्तानुसार, कोयाली येथील आयओसीएल रिफायनरीला दुपारी चार वाजता स्फोटामुळे आग लागली. अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत होते. स्फोटानंतर रिफायनरीत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.