शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

उद्धव ठाकरेंच्या हाती 'मशाल' राहणार?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 09:07 IST

मशाल चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.

नवी दिल्ली – गेल्या वर्षी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्षात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. शिंदे-ठाकरे वादात शिवसेना कुणाची आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार हा प्रश्न उभा राहिला. त्यात निवडणूक आयोगाने कागदपत्राच्या आधारे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंच्या गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची कोंडी झाली. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह तात्पुरते वापरण्यास दिले होते. मात्र या मशाल चिन्हावरही समता पार्टीने आक्षेप घेतला.

मशाल चिन्ह ही आमची निशाणी असून ती उद्धव ठाकरेंना देऊ नये अशी मागणी समता पार्टीने केली होती. त्याबाबत निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. धगधगती मशाल हे चिन्ह दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीचे आहे. १९९६ पासून हे चिन्ह समता पार्टीकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी दिल्ली हायकोर्टात समता पार्टीने ही याचिका केली होती. परंतु दिल्ली हायकोर्टाने ती याचिका फेटाळली त्यानंतर समता पार्टीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

मशाल चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. या सुनावणीत नेमके काय होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांचे म्हणणं मांडताना सांगितले की, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल हे चिन्ह दिले होते. पण ते अंतिम नाही. पोटनिवडणुकीनंतर चिन्हाचा पुर्नवाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो असं उत्तर समता पार्टीला देण्यात आले होते. परंतु अद्याप काहीही निर्णय न झाल्याने समता पार्टीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

समता पार्टीचा दावा काय?

१९९६ पासून मशाल चिन्ह जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीकडे आहे. २००४ मध्ये समता पार्टीला मशाल चिन्ह देत ते नोंदणीकृत केले आहे असं समता पार्टी महाराष्ट्रने कळवलं. आमचा पक्ष १९९४ पासून राष्ट्रीयकृत पक्ष आहे. जनमाणसांत आमची प्रतिष्ठा आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्हाऐवजी दुसरं चिन्ह द्यावं अशी विनंती समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तृणेश अरुण देवळेकर यांनी निवडणूक आयोगाला केली होती. १९९४ मध्ये जॉर्ज फर्नांडिज, नितीश कुमार या नेत्यांनी मिळून लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात नवीन पक्ष निर्माण केला होता. ९९५ च्या विधानसभा निवडणुकीत समता पार्टीला ७ जागा मिळाल्या होत्या. तर १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत समता पार्टीने भाजपासोबत आघाडी केली होती. १९९६ मध्ये समता पार्टीने बिहारमध्ये ६, उत्तर प्रदेश आणि ओडिशात प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८ च्या निवडणुकीत १२ जागांवर विजय मिळवला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय