मसाकाला ६८ कोटी कर्ज मंजूर

By Admin | Updated: October 31, 2015 22:44 IST2015-10-31T22:44:58+5:302015-10-31T22:44:58+5:30

जळगाव- मधुकर सहकारी साखर कारखान्याला ६८.५९ कोटी रुपये कर्ज विविध कामांसाठी देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत शनिवारी घेण्यात आला.

Masaka sanctioned 68 crores loan | मसाकाला ६८ कोटी कर्ज मंजूर

मसाकाला ६८ कोटी कर्ज मंजूर

गाव- मधुकर सहकारी साखर कारखान्याला ६८.५९ कोटी रुपये कर्ज विविध कामांसाठी देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत शनिवारी घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी रोहिणी खडसे होत्या. उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, संचालक चिमणराव पाटील, सुरेश भोळे, नानासाहेब देशमुख, वाडीलाल राठोड, ॲड.रवींद्र पाटील, डॉ.सुरेश पाटील, संजय पवार, अनिल भाईदास पाटील, राजीव देशमुख, नंदकिशोर महाजन, गणेश नेहेते, तिलोत्तमा पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.
मधुकर साखर कारखान्याला मालतारणापोटी ६२.५० कोटी रुपये, एफआरपी रक्कम देण्यासाठी ९ लाख १७ हजार रुपये आणि सॉफ्ट लोन व पूर्वहंगामी कर्ज म्हणून सात कोटी रुपये कर्ज देण्यात आले.

नाबार्डतर्फे आर्थिक साक्षरता केंद्र
नाबार्डतर्फे सर्व तालुक्यांमध्ये आर्थिक साक्षरता केंद्र उघडण्यास मंजुरी देण्यात आली. तालुकास्तरावर हे केंद्र असतील.
सूतगिरणी भाडेतत्त्वावर देणार
जे.टी.महाजन सूतगिरणी १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून जे योग्य दरात भाडेतत्वावर घेतील त्यांना ही गिरणी चालविण्यास दिली जाईल, असा निर्णय झाला.

कर्मचार्‍यांना १२ दिवसांचा बोनस
जिल्हा बँकेचे कर्मचारी अधिक मेहनत घेतात. मनुष्यबळ कमी असताना शाखा चालतात. ही बाब लक्षात घेता कर्मचार्‍यांना १२ दिवसांचे वेतन बोनस म्हणून देण्याचा निर्णय झाला. संजय पवार, नंदकिशोर महाजन, डॉ.सुरेश पाटील आदींनी हा मुद्दा मांडला होता.
मंगरूळ, वाडीशेेवाळे शाखा बंद
नाबार्डने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार व्यवहार होत नसल्याने मंगरूळ ता.चोपडा व वाडीशेवाळे ता.पाचोरा येथील जिल्हा बँकेच्या शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Masaka sanctioned 68 crores loan