मार्क्सवादी महिलांवर बलात्कार करा!
By Admin | Updated: July 1, 2014 09:34 IST2014-07-01T02:04:23+5:302014-07-01T09:34:34+5:30
कम्युनिस्ट पार्टीच्या महिला कार्यकत्र्यावर बलात्कार करा, असे संतापजनक अन् तेवढेत निंदनीय विधान लोकप्रिय बंगाली अभिनेते व तृणमूल काँग्रेसचे खा. तापस पाल यांनी केले आहे.

मार्क्सवादी महिलांवर बलात्कार करा!
>प्रक्षोभक विधान : तृणमूलच्या खासदारावर देशभरातून टीका
कोलकाता : मी आमच्या कार्यकत्र्याना सांगेन जा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या महिला कार्यकत्र्यावर बलात्कार करा, असे संतापजनक अन् तेवढेत निंदनीय विधान लोकप्रिय बंगाली अभिनेते व तृणमूल काँग्रेसचे खा. तापस पाल यांनी केले आहे. त्यांचे हे विधान कॅमे:यात बंदिस्त झाल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर त्यावर देशभरात तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत.
बंगालच्या स्थानिक टीव्ही वाहिनीने जारी केलेला व्हिडिओ अस्पष्ट असला तरी पाल असे विधान करीत असताना स्पष्ट ऐकू येत आहे. पक्ष कार्यकत्र्याना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. तुम्हाला कुणीही हात लावू शकणार नाही. सत्ताधारी पक्षाच्या एकाही कार्यकत्र्यावर हल्ला झाल्यास माकपच्या कार्यकत्र्याना ठार मारले जाईल. या पक्षाच्या महिलांवर बलात्कार केले जातील, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. (वृत्तसंस्था)
कारवाईचे काय ?
पाल यांच्या विधानाने वादाचे मोहोळ उठले असतानाच तृणमूल काँग्रेसने त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पाल यांचे विधान अतिशय असंवेदनशील असून आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करीत नाही, असे तृणमूल काँग्रेसचे खा. डेरेक ओ ब्रायन यांनी म्हटले आहे.
लोकसभा अध्यक्षांनी दखल घ्यावी - माकपा
पाल यांच्या विधानाची लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्र महाजन यांनी स्वत:हून दखल घ्यावी, अशी मागणी माकपाने केली आहे.
काय दिली धमकी
माकपाची माणसे येथे असतील तर ऐका. तुम्ही आमचे कार्यकर्ते किंवा त्यांच्या कुटुंबीयांना चौमाहा गावी हात लावाल तर तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल. स्मार्ट बनू नका, मी तुमच्यापेक्षा अधिक स्मार्ट आहे, असे पाल यांनी चौमाहा गावातील सभेत सांगितले.