‘मार्स ऑर्बिटर’ 33 दिवसांत मंगळावर
By Admin | Updated: August 24, 2014 02:34 IST2014-08-24T02:34:50+5:302014-08-24T02:34:50+5:30
देशाच्या महत्त्वाकांक्षी ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ची फत्ते होण्याकडे वाटचाल सुरू आहे.

‘मार्स ऑर्बिटर’ 33 दिवसांत मंगळावर
चेन्नई : देशाच्या महत्त्वाकांक्षी ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ची फत्ते होण्याकडे वाटचाल सुरू आहे. मंगळ या लाल ग्रहापासून हे यान अवघ्या 9क् लाख किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने(इस्ने) शनिवारी दिली.
मंगळ ऑर्बिटर मिशन(एमओएम) आता मंगळापासून फक्त 9क् लाख कि.मी. दूर असून त्याने पृथ्वीपासून 18.9 कोटी कि.मी. अंतर कापले आहे. केवळ 33 दिवसांत हे यान मंगळावर पोहोचेल, असे इस्नेने सोशल नेटवर्किग साईटवर दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
या महिन्याच्या प्रारंभी वैज्ञानिकांनी मंगळ मिशनच्या मार्गात सुधारणा केली जाण्याची शक्यता फेटाळताना यान योग्यरीत्या मार्गक्रमण असल्याचे स्पष्ट केले होते. मंगळ मोहिमेच्या यशामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय अंतराळ क्षेत्रतील दबदबा आणखी वाढणार आहे. (वृत्तसंस्था)
4मंगळ मोहिमेवर सुमारे 45क् कोटी रुपयांचा खर्च असून गेल्या वर्षी 5 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून धुव्रीय प्रक्षेपक यानातून ते अवकाशात ङोपावले होते. या यानाला 24 सप्टेंबर्पयत मंगळाच्या कक्षेत पोहोचविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. मंगळ मोहिमेतून वैज्ञानिकांना विविध ग्रहांच्या संशोधनाची संधी उपलब्ध होईल, असे मानले जाते.