दारुड्या तरुणांनी केला महिलेचा विनयभंग
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:08+5:302015-01-23T01:05:08+5:30
नागपूर : दारूच्या नशेत तरर्र असलेल्या दोन तरुणांनी चहाविक्रेत्या महिलेशी असभ्य वर्तन करून तिला अश्लिल शिवीगाळ केली. आज सकाळी १०. ३० च्या सुमारास सक्करदऱ्यात घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला होता.

दारुड्या तरुणांनी केला महिलेचा विनयभंग
न गपूर : दारूच्या नशेत तरर्र असलेल्या दोन तरुणांनी चहाविक्रेत्या महिलेशी असभ्य वर्तन करून तिला अश्लिल शिवीगाळ केली. आज सकाळी १०. ३० च्या सुमारास सक्करदऱ्यात घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला होता.पीडित महिला (वय २१) चहाची टपरी चालवते. नेहमीप्रमाणे ती आज सकाळी चहा बनवित असताना अजिंक्य विजयराव भुजाडे (वय २३) आणि विक्रांत कोठीराम अतकरे (वय २५) हे स्वीफ्ट कारने (एमएच ३१/ डीसी १७९९) तेथे आले. ते दारूच्या नशेत होते. त्यांनी पीडित महिलेला अश्लिल हातवारे केले. तिने आक्षेप घेतला असता आरोपींनी तिला अश्लिल शिवीगाळ करून तिचा हात पकडला. चहाची टपरी बंद करण्यास सांगितले. यामुळे महिला संतापली. तिचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यांनी भुजाडे आणि अतकरेला पकडले. नागरिकांनाही हे तरुण दमदाटी करू लागले. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी या दोघांना सक्करदरा पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. हे दोघेही गरोबा मैदानाजवळ राहतात. ---अल्पवयीन मुलीचा विनयभंगनागपूर : शिकवणीला जाणाऱ्या मुलीचा (वय १६) पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या राज फारुकी नामक आरोपीवर जरीपटका पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.----