तरुणाला मुली ऐवजी पसंत पडली होणारी सासू; 3 मुलांना सोडून महिला गेली पळून, पती म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 13:53 IST2023-04-05T13:53:24+5:302023-04-05T13:53:55+5:30
तरुणाला मुलगी पसंत पडली नाही तर मुलीची काळजी घेणाऱ्या आईवरच मुलाचा जीव जडला.

तरुणाला मुली ऐवजी पसंत पडली होणारी सासू; 3 मुलांना सोडून महिला गेली पळून, पती म्हणतो...
पश्चिम बंगालमधील मालदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक तरुण लग्नासाठी मुलगी पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची चांगली काळजी घेण्यात आली. पण, तरुणाला मुलगी पसंत पडली नाही तर मुलीची काळजी घेणाऱ्या आईवरच मुलाचा जीव जडला. यानंतर तरुण मुलीच्या आईसोबत पळून गेला. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिलेच्या पतीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून महिलेचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालदातील गजोल पोलीस स्टेशन हद्दीतील करकच पंचायतीच्या इचाहार गावात 25 मार्च रोजी ही घटना घडली. महिलेचा पती गजोल याने पत्नीचा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र, ती आतापर्यंत सापडलेला नाही. गजोल म्हणाला की तिची मुलगी लग्नासाठी पात्र आहे. मी तिच्यासाठी वर शोधत होतो.
तीन मुलांना सोडून महिला गेली पळून
25 मार्च रोजी एक तरुण आपल्या मुलीला लग्नासाठी पाहण्यासाठी आला होता. मात्र, त्यानंतर तो माझ्या पत्नीसह फरार झाला आहे. जसजसा काळ सरत आहे, तसतशी चिंता वाढत आहे. मुलीच्या आईबद्दल कोणतीही माहिती आता उपलब्ध नाही. तीन मुलांना सोडून आपल्या मुलीला पाहण्यासाठी आलेल्या तरुणासोबत ही महिला पळून गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण आहे.
स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. गजोल बायकोचा फोटो घेऊन इकडे तिकडे फिरतोय. एका व्यक्तीने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"