शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

तोतया पुरुष बनून 'तिनं' केला दोघींशी विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 9:17 PM

प्रत्यक्षात स्त्री असूनही पुरुष असल्याचा बनाव रचून केवळ हुंड्यासाठी दोन महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक करणा-या स्त्रीरूपातील एका तोतया नवरदेवाला उत्तराखंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

डेहराडून - प्रत्यक्षात स्त्री असूनही पुरुष असल्याचा बनाव रचून केवळ हुंड्यासाठी दोन महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक करणा-या स्त्रीरूपातील एका तोतया नवरदेवाला उत्तराखंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील एका पत्नीचा हुंडा दिला नाही म्हणून या स्त्रीरूपातील बनावट नवरदेवाने खूप मानसिक छळही केला. नैनितालचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जमनेय खंडुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठकसेन महिलेचे नाव कृष्णा सेन ऊर्फ स्विटी असे असून, ती उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील धामपूर गावात वास्तव्याला आहे.पोलिसांनी सांगितले की, कृष्णाचे वागणे व दिसणे हे पुरुषी धाटणीचे असल्याने ती प्रत्यक्षातही आपण पुरुषच असल्याचे लोकांना भासविते. कृष्णाने फेसबुकवर 2013 साली अकाऊंट उघडून आपली पुरुषी थाटाची अनेक छायाचित्रे या अकाऊंटवर प्रसिद्ध केली. फेसबुकच्या माध्यमातून तिने दोन मुलींशी मैत्री केली व त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघींशी तिने विवाहसुद्धा केला. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या हल्दवानी येथील काठगोदाम भागातल्या एका मुलीला 2014साली कृष्णा भेटली. अलिगढ येथील सीएलएफ बल्बच्या एका उद्योजकाचा आपण मुलगा असल्याची बतावणी करत कृष्णाने त्या मुलीशी विवाह केला. त्यानंतर आपल्या पत्नीला या कथित स्त्रीरुपातील नवरदेवाने हुंड्यासाठी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कृष्णाने कालाधुंगी शहरातल्या एका तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले व तिच्याशीसुद्धा विवाहबद्ध झाली. कहर म्हणजे कृष्णाने जो पहिला विवाह केला होता त्याला ही दुसरी तरुणी हजर होती. कृष्णा इतकी निर्ढावलेली होती की, तिने हल्दवानी भागामधील तिकोनिया भागात एक खोली भाड्याने घेऊन तिथे आपल्या दोन्ही पत्नींना एकत्र नांदवायला सुरुवात केली.कालाधुंगी येथील दुस-या पत्नीला कृष्णा पुरुष नाही हे कळून चुकले होते. पण पैशाचे आमिष दाखवून कृष्णाने तिचे तोंड बंद केले. मात्र काठगोदाम येथील मुलीने मात्र कृष्णाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर कृष्णाला अटक करण्यात आली.लहानपणापासून टॉमबॉयअटकेनंतर पोलिसांना दिलेल्या जबानीत कृष्णाने सांगितले की, लहानपणापासून आपण टॉमबॉय आहोत व स्वत:ला मुलगाच समजते. त्यामुळेच पुरुषांच्या पद्धतीने हेअरकट करून घेतला होता. मोटारसायकल चालवायला शिकले तसेच सिगारेटही ओढू लागले. लग्न झाल्यावर तिने या दोन्ही पत्नींना आपल्या शरीराला स्पर्श करायला लावला. सेक्स टॉइजच्या माध्यमातून लैंगिक संबंधही राखले. पोलीस आता कृष्णा सेन हिच्या कुटुंबीयांचीही चौकशीही करत आहेत.