लग्न, हनीमून अन् शारीरिक संबंधांना नकार...; अखेर ५० तासांनंतर 'फॅमिली ड्रामा' संपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:33 IST2025-04-02T10:33:31+5:302025-04-02T10:33:58+5:30
५० तासांपासून शालिनी पती प्रणवच्या घराबाहेर धरणे आंदोलन करत होती. त्यात मध्यस्थांकडून हा वाद मिटवून तोडगा काढण्यात आला आहे

लग्न, हनीमून अन् शारीरिक संबंधांना नकार...; अखेर ५० तासांनंतर 'फॅमिली ड्रामा' संपला
मुजफ्फरनगर - यूपीच्या मुजफ्फरनगर येथे राहणारी शालिनी सिंघल या महिलेने सासरच्या गेटसमोर सुरू केलेले आंदोलन जवळपास ५० तासांनी मागे घेतले आहे. शालिनीला पती प्रणव सिंघल यांच्या घरी म्हणजे सासरी एन्ट्री मिळाली आहे. स्थानिक नेत्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला. नेते, वयोवृद्धांनी दोन्ही कुटुंबाशी संवाद साधल्यानंतर यावर तोडगा निघाला. शालिनी यांनी पती प्रणव यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. लग्नानंतर प्रणवने ५० लाख रूपये मागितल्याचा दावा पत्नी शालिनीने केला होता.
पैसे दिले नाहीत म्हणून पतीने शालिनीनाला तिच्या माहेरी सोडले आणि तिथून परत घेऊन जात नव्हता. जेव्हा स्वत: ती सासरी आली तेव्हा सासरच्यांनी घरचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सासरच्या घराबाहेरच तिने धरणे आंदोलन सुरू केले. पती-पत्नी हनीमूनवरून परतल्यापासून हा वाद सुरू झाला होता. हे जोडपे हनीमूनसाठी इंडोनेशियाच्या बाली येथे गेले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. तर पत्नीचे आरोप पतीने फेटाळत मी पैशांची मागणी केली नाही, लग्नानंतर पत्नीने शारीरिक संबंध बनवायला दिले नाहीत. हात लावला तर केस दाखल करेन, वकील आहे असं पत्नीने धमकावल्याचं पती प्रणवने म्हटलं.
हनीमूनवरून परतल्यानंतर वाद
शालिनी आणि प्रणव यांचं लग्न याच वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या १२ तारखेला झाले होते. लग्नानंतर दोघेही हनीमूनसाठी इंडोनेशियाला गेले. लग्नानंतर सासरच्यांनी मी आवडत नव्हते. हनीमूनला पतीसोबत गेली परंतु तो एकही शब्द बोलला नाही. केवळ ५० लाखांच्या हुंड्याची मागणी केली. आता सासरचे मला घरातही घेत नाहीत असा आरोप शालिनीने केला त्यावर मला तिच्या जवळही येऊ देत नव्हती. शारीरिक संबंधाला विरोध करत होती. शालिनीपासून माझ्या जीविताला धोका आहे असा आरोप पतीने केला आहे.
वादावर काढला तोडगा
५० तासांपासून शालिनी पती प्रणवच्या घराबाहेर धरणे आंदोलन करत होती. त्यात मध्यस्थांकडून हा वाद मिटवून तोडगा काढण्यात आला आहे. शालिनीला पती प्रणवच्या घरात एन्ट्री मिळाली आहे. पत्नीच्या आंदोलनाची बातमी माध्यमांत झळकल्यानंतर जोडप्यातील वाद संपवण्यासाठी अनेक प्रतिष्ठित लोक आले. त्यात सपा, रालोद आणि भाजपा नेतेही पुढे होते. या जोडप्यात तोडगा काढण्यात आला. त्यानंतर नव्या नवरीनं धरणे आंदोलन मागे घेतले. या लोकांनी दोन्ही जोडप्यांना समोरासमोर बसवून वाद मिटवला त्यानंतर शालिनी आणि प्रणव दोघे एकत्रित घरात गेले.