मारोती वाघमारे यांचे निधन

By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:36+5:302015-02-14T23:50:36+5:30

चाकूर : लातूररोड येथील मारोती माधवराव वाघमारे (८४) यांचे शनिवारी दुपारी १ च्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ८ वा़ लातूर रोड येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे़ लातूररोड येथील श्री संत गोविंदबाबा मंदिर उभारणीत यांचा विशेष सहभाग होता़

Maroti Waghmare passes away | मारोती वाघमारे यांचे निधन

मारोती वाघमारे यांचे निधन

कूर : लातूररोड येथील मारोती माधवराव वाघमारे (८४) यांचे शनिवारी दुपारी १ च्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ८ वा़ लातूर रोड येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे़ लातूररोड येथील श्री संत गोविंदबाबा मंदिर उभारणीत यांचा विशेष सहभाग होता़

़़़

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
हरंगुळ बु़ : लातूर तालुक्यातील हरंगुळ बु़ येथील एकाने शेतातील आंब्यास झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे़
नागनाथ गणपती कांबळे (५५, रा़ हरंगुळ बु़, हल्ली मु़ इंदरठाणा) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे़ नागनाथ कांबळे यांनी शुक्रवारी सकाळी शेतातील अंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे़ आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही़ याप्रकरणी अशोक सरवदे यांच्या फिर्यादीवरुन लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ अधिक तपास पोहेकॉ एच़ सी़ राख करीत आहेत़

Web Title: Maroti Waghmare passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.