(मारिया यांचे ब्रीफींग)
By admin | Updated: August 28, 2015 00:30 IST
(मारिया यांचे ब्रीफींग)
(मारिया यांचे ब्रीफींग)
(मारिया यांचे ब्रीफींग)मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी लोकमतशी बोलताना शीना बोराची हत्या अत्यंत शांत डोक्याने व आगाऊ कट आखून केल्याचे आतापर्यंच्या तपासातून स्पष्ट होत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, तपास सुरू होऊन अवघे ४८ तास लोटले आहेत. अजून बराच तपास बाकी आहे. अटक आरोपींनी दिलेल्या माहितीची शहानिशा व्हायची आहे. त्यामुळे या टप्प्यावर अधिक माहिती देणे उचित होणार नाही. हत्येनंतर शीनाच्या नावे मुंबई मेट्रो वन कंपनीत तिचा राजीनामा पाठविणार्या तसेच ती ज्या घरात भाडयाने राहात होती तेथील घरमालकाला भाडेकरार संपविण्याबाबत पत्र पाठवणार्या व्यक्तीचा जबाब खार पोलिसांनी नोंदवला आहे. या व्यक्तीने या प्रकरणात अटक महिला आरोपीसाठी(इंद्राणी) दोन्ही कागदपत्रांवर शीनाच्या खोटया सहया केल्या होत्या, अशी माहिती मारिया यांनी दिली.आरोपी इंद्राणीने शीनाच्या हत्येची कबुली दिली का, या लोकमतने उपस्थित केलेल्या प्रश्नावर मारिया यांनी बोलणे टाळले. मात्र अन्य एका वरिष्ठ अधिकार्याने अद्याप इंद्राणीने गुन्हा कबूल केलेला नाही. शीनाची हत्या दुसरा पती संजय खन्ना व ड्रायव्हर श्याम राय यांनी मिळून केल्याचेच सांगते आहे, अशी माहिती दिली.डीएनए चाचणीसाठी नमुने मिळालेशीना बोरा हत्याकांडाच्या तपासाशी संलग्न असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार आरोपी इंद्राणी मुखर्जीने अन्य साथीदारांसोबत हत्या करून पेणच्या गोदादे गावात जाळलेला मृतदेह शीनाचाच होता हे स्पष्ट करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या अधिकार्यानुसार त्या ठिकाणाहून डीएनए चाचणीसाठी आवश्यक असलेले मृतदेहाचे अवशेष पोलिसांच्या हाती लागले आहे. मुळात तीन वर्षांपुर्वी पेण पोलिसांनी गोदादे खिंडीत सापडलेल्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. आत तीन वर्षांनंतर तो मृतदेह शीनाचाच कशावरून हा मुख्य प्रश्न खार पोलिसांसमोर उभा होता. मात्र नमुने सापडल्याने काहीच दिवसात मृतदेह कोणाचा या प्रश्नाचे उत्तर खार पोलिसांना मिळणार आहे.