प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्येही ‘महिला राज’! प्रस्तावावर विचार सुरू, तिन्ही सैन्यदले, मंत्रालये व विभागांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 06:38 IST2023-05-08T06:37:16+5:302023-05-08T06:38:52+5:30
पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात संचलन करणारी तुकडी आणि बँड पथक पूर्णपणे महिलांचे असू शकते.

प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्येही ‘महिला राज’! प्रस्तावावर विचार सुरू, तिन्ही सैन्यदले, मंत्रालये व विभागांना निवेदन
नवी दिल्ली : पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर होणाऱ्या मुख्य सोहळ्यात संचलन करणारी तुकडी आणि बँड पथक पूर्णपणे महिलांचे असू शकते. लष्करी अधिकारी या प्रस्तावावर काम करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
संरक्षण मंत्रालयाने मार्चमध्ये २०२४च्या संचलन योजनेवर तिन्ही सैन्यदले, विविध मंत्रालये आणि विभागांना एक कार्यालयीन निवेदन पाठवले असून, या निवेदनात अशा प्रकारच्या प्रस्तावावर विचार करण्याची सूचना केलेली आहे. फेब्रुवारीच्या प्रारंभी संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार, सत्ता टिकवण्यासाठी भाजपची शक्ती पणाला
मते मागविणार
या बैठकीत सखोल विचारविनिमय केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर आयोजित संचलनात सहभागी सर्व तुकड्यांत (संचलन आणि बँड पथक) तसेच कवायती व इतर सादरीकरणात केवळ महिलांचाच सहभाग असेल.
गेल्या काही वर्षांपासून कर्तव्य पथावर होणाऱ्या वार्षिक संचलनात महिला अधिकारीही सहभाग घेत आहेत. यात लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे.