शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 08:11 IST

Delhi Blast Update: राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साखरे केरळ केडरचे आयपीएस असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांचे पथक नेमण्यात आले आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे दिल्लीस्फोटाच्या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. साखरे केरळ केडरचे आयपीएस असून, त्यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यांचे पथक नेमण्यात आले आहे.

गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) या स्फोटाचा तपास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर एनआयचे महासंचालक सदानंद दाते यांनी तपासाची जबाबदारी साखरे यांच्याकडे सोपविली. 

कोण आहेत साखरे ? एनआयएचे अतिरिक्त महासंचालक असलेले विजय साखरे केरळ केडरचे १९९६ बॅचचे आयपीएस आहेत. २०२२ मध्ये त्यांना एनआयएमध्ये प्रतिनियुक्तीवर महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच त्यांना अतिरिक्त महासंचालकपदी बढती देण्यात आली. साखरे प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. आयपीएस झाल्यावर साखरे यांनी हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

साखरेंसोबत दहा सदस्यांचे पथक असेल. यात १ महानिरीक्षक, २ उपमहानिरीक्षक, तीन पोलिस अधीक्षक आणि उर्वरित उप अधीक्षकांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Marathi officer to investigate Delhi blast case: Who is he?

Web Summary : NIA's Vijay Sakhare, a Kerala cadre IPS officer, leads Delhi blast probe. Appointed by NIA chief Sadanand Date after Home Minister Shah's decision. Sakhare, a 1996 batch IPS, known for integrity, heads a ten-member team.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटPoliceपोलिस