शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 15:21 IST

महाराष्ट्रात सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने आता उग्र रूप धारण केल्याने राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रात सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने आता उग्र रूप धारण केल्याने राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक बोलावली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत या बैठकीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. 

नोव्हेंबरअखेर आरक्षण; ‘मेगाभरती’ला स्थगिती

दरम्यान, काहीही झाले, तरी उशिरात उशिरा म्हणजे येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत न्यायालयात टिकू शकेल, अशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना दिली होती.. मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने या आधी जाहीर केलेली ६८ हजार रिक्त पदे भरण्यासाठीची ‘मेगाभरती’ सुरू केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.‘संयमाचा अंत पाहू नका’, ‘जो प्राण देऊ शकतो, तो प्राण घेऊही शकतो’ आणि ‘द्यायचे नसेल तर स्पष्टपणे नाही सांगा आणि होणारे परिणाम भोगायला तयार राहा’ अशा धमकीवजा आव्हानात्मक भाषेत मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या पुण्यात झालेल्या परिषदेत प्रक्षोभक इशारा दिला गेल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्र्यांनी ‘दूरदर्शन’च्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून राज्यातील जनतेशी थेट संवाद साधताना वरील प्रमाणे ग्वाही दिली. मेगाभरतीत कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, कोणाच्याही नोकरीच्या संधी हिरावून घेतल्या जाणार नाहीत यासाठी सरकार उचित पावले सरकार उचलत आहे, यावर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाह