शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अडचणी अनेक आल्या, पण त्यावर मात करत सरदार सरोवर उभे राहिले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 15:50 IST

सरदार सरोवराच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सरदार सरोवर उभे राहिले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. सरदार सरोवर धरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आले.

दभोई (गुजरात), दि. 17 -  सरदार सरोवराच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या. मात्र या सर्व अडचणींवर मात करत सरदार सरोवर उभे राहिले, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काढले. सरदार सरोवर धरण पंतप्रधान नरेंद्र यांच्या हस्ते आज देशाला अर्पण करण्यात आले. दरम्यान, नर्मदा महोत्सवाच्या समारोप समारंभात बोलताना मोदींनी सरदार सरोवर हे बांधकामाचा अप्रतिम नमुना असून, हे सरोवर म्हणजे देशाला मिळालेली मोठी देणगी असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, "विश्वकर्मा जयंतीदिवशी हे धरण देशाला अर्पण करणे म्हणजे या धरणाचे बांधकाम करणाऱ्यांचे स्मरण आहे. जर सरदार पटेल आणि डॉ. आंबेडकर जर काही वर्षे अधिक जीवित राहिले असते तर हे धरण 60 किंवा 70 च्या दशकातच बांधून पूर्ण झाले असते."यावेळी या धरणाच्या बांधकामामध्ये आलेल्या अडचणींचाही मोदींनी उल्लेख केला."या धरणाच्या बांधकामात अडथळे आणण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र या सर्व अडचणींवर मात करत धरण उभे राहिले,"असे मोदी म्हणाले. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या आदिवासींच्या आठवणीही मोदींनी जागवल्या. ते म्हणाले,"काही लोकांना वाटते की केवळ मुठभर लोकांनीच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. मात्र आदिवासींच्या त्यागाचे विस्मरण झाले आहे."56 वर्षापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी भूमिपूजन केलेल्या सरदार सरोवर धरणाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. जगातील दुसरे आणि भारतातील सर्वांत मोठे धऱण ठरणार आहे. या लोकार्पणासाठी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन १९६१ मध्ये झाले होते. मात्र, दप्तरदिरंगाई, विस्थापितांचा विरोध, न्यायालयीन लढा यामुळे प्रकल्प साठ वर्षे रेंगाळला होता.  दरवाजे बंद केल्यावर धरणाची उंची १३८ मी पर्यंत वाढली तसेच या धरणाची जलसाठा क्षमता ४.३ दशलक्ष क्युबिक मिटर्स इतकी झाली. पूर्वी धरणाची उंची १२१.९२ मी. इतकी होती.  या धरणाचा प्रत्येक दरवाजा ४५० टन वजनाचा असून तो बंद होण्यासाठी एका तासाचा अवधी लागतो. सरदार सरोवर हे त्यामध्ये वापरण्यात आलेल्या सर्वाधिक कॉक्रीटच्या वापरामुळेही चर्चेत आहे. सर्वात जास्त कॉक्रीट या धरणासाठी वापरले गेले आहे. अमेरिकेतील ग्रँड काऊली धरणानंतर सर्वात मोठे धरण म्हणून सरदार सरोवर प्रकल्पाचे नाव घेतले जाणार आहे. या धरणातून तयार झालेल्या विजेपैकी ५७ टक्के वीज महाराष्ट्र, २७ टक्के वीज मध्य प्रदेश तर ६ टक्के वीज गुजरात वापरणार आहे. १.२ किमी लांब या धरणावरील प्रकल्पाने आजवर ४१४१ कोटी युनीटची वीज निर्मिती केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतGujaratगुजरातBJPभाजपा