शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

मनोहर पर्रीकर विक्रमी मताधिक्यानं विजय होतील, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 2:21 PM

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे.

पणजी, दि. 23 - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला आहे. सांपेद्र येथील रायबंदर सरकारी प्राथमिक शाळेतील केंद्रावर दुपारी मतदान केल्यानंतर नाईक म्हणाले की, ''गेल्या निवडणुकांपेक्षा यावेळी मनोहर पर्रीकर यांना जास्त मताधिक्य मिळेल. पर्रीकर यांनी ज्या पद्धतीनं गोव्याचा विकास केला आहे ते पाहता लोकं त्यांच्याबरोबरच राहतील. वाळपईत विश्वजित राणे हे यशस्वी आणि कर्तबगार मंत्री म्हणून ओळखले जातात त्यांनाही लोकांचा पाठिंबा आहे. दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपाला बाहेरुन उमेदवार आणावे लागले''. 

दुसरीकडे गोवा सुरक्षा मंचचे मार्गदर्शक तथा माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी मात्र या निवडणुकीत त्यांचा उमेदवार आनंद शिरोडकर हे पर्रीकर यांचा पराभव करुन निवडून येतील, असा दावा केला आहे. ते म्हणाले की, गेल्यावेळेला लोकांची अशी भावना बनली होती की गोवा सुरक्षा मंचला मते दिल्यास बाबुश मोन्सेरात हे निवडून येतील. त्यामुळे त्यांनी भाजपाला मतदान केले आणि सिद्धार्थ निवडून आले परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत चार तासांच्या कालावधीत पणजीत ३४.६५ टक्के तर वाळपईत ४0.0२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली.