शहरं
Join us  
Trending Stories
1
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
3
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
4
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
5
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
6
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
7
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
8
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
9
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
10
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
11
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
12
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
13
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
14
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
15
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
16
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
17
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
18
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
19
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
20
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
Daily Top 2Weekly Top 5

'हिज्बुल मुजाहिद्दीन'मध्ये सहभागी झालेल्या मन्नान वानीचा रूममेट बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 10:56 IST

जम्मू काश्मीरमध्ये राहणारा बेपत्ता एएमयूचा विद्यार्थी मन्नान वानी याच्यासंदर्भातील प्राथमिक तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अलीगड- जम्मू काश्मीरमध्ये राहणारा बेपत्ता एएमयूचा विद्यार्थी मन्नान वानी याच्यासंदर्भातील प्राथमिक तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मन्नान वाणीचा रूममेट मुजम्मिल हुसैन जुलै 2017पासून बेपत्ता आहे. मुजम्मिल हुसैन जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामधील राहणार आहे. मन्नान वाणी हिज्बुलमध्ये सामिल झाला हे बोलणं आता घाईचं ठरेल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मन्नान वाणी हिज्बुलमध्ये सामिल झाल्याच्या वृत्तानंतर यूपी एटीएसने सोमवारी दोन काश्मीरी विद्यार्थ्यांची कसून चौकशी केली. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हॉस्टेलमधील वानीच्या खोलीत संशयास्पद सामान सापडलं आहे. पुस्तकं, फोटो, पेन ड्राइव्हबरोबरच काही संशयास्पद कागदपस्त्र सापडली आहेत. 

जम्मू-काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महानिर्देशक मुनीर खान यांनी सांगितलं की, वानीच्या खोलीतून मिळालेल्या सामानाचा तपास सुरू आहे. वानीने 2017मध्ये हिज्बुलचं कॅलेंडर हॉस्टेलमध्ये वाटलं होतं, अशीही माहिती अलीगड पोलिसांना तपासात मिळाली आहे. अलीगडचे एसएसपी राजेश पांडे यांच्या माहितीनुसार, वानीचा रूममेट हुसैन गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून हॉस्टेलमध्ये परतला नाही. मन्नानला 2 जानेवारीला शेवटचं पाहिलं होत, असं हॉस्टेलच्या मेस चालविणाऱ्या व्यक्तीने सांगितलं. मन्नान वाणीला अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीमधून निलंबित करण्यात आलं आहे. दोन दिवस आधी त्याचा हातात रायफल घेऊन फोटो व्हायरल झाला होता. 5 जानेवारी रोजी तो हिज्बुलमध्ये सहभागी झाल्याचं फोटोवर म्हंटलं होतं. 

एएमयूच्या पीआरओंनी दिलेल्या माहितीनुसार, भूगर्भ शास्त्राचा रिसर्च स्कॉलर मन्नान बशीर वानीला संस्थेन निलंबित केलं आहे. तसंच हबीब हॉल हॉस्टेलमधील त्याची खोली सील केली गेली आहे. 

कोण आहे मन्नान वाणी ?मन्नान वानी (वय 26)  जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हा तरूण आहे.  ५ जानेवारी रोजी तो हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत सामील झाला आहे. अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातून तो पीएचडीचं शिक्षण घेत होता. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटनुसार मन्नान वाणी हा 'स्ट्रक्चरल अॅण्ड जिओ-मोरफोलॉजिकल स्टुडी ऑफ लोबल व्हॅली, काश्मीर' या विषयावर पीएचडी करत होता. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार. मन्नानला 2016 मध्ये ‘जल, पर्यावरण आणि समाज’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्तम रिसर्च पेपर सादर केल्याबद्दल पुरस्कार मिळाला होता. त्याने काश्मीर विद्यापीठातून भूगर्भ शास्त्रात पदवी घेतली होती. यानंतर त्याने पदव्यूत्तर शिक्षण अलीगड विद्यापीठातून घेतलं.  

टॅग्स :Hizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी