थँक्स मनमोहन सिंग!
By Admin | Updated: May 16, 2014 03:46 IST2014-05-16T03:46:14+5:302014-05-16T03:46:14+5:30
मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांच्या प्रदीर्घ काळात देशाचे नेतृत्व केले.पंतप्रधान कार्यालय तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विशेष निरोप व आभार समारंभदेखील आयोजित केला.

थँक्स मनमोहन सिंग!
नवी दिल्ली : मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांच्या प्रदीर्घ काळात देशाचे नेतृत्व केले. अर्थशास्त्रात नावाजलेले नाव असलेल्या डॉ. सिंग यांना पंतप्रधान कार्यालय तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विशेष निरोप व आभार समारंभदेखील आयोजित केला. परंतु देशाला स्थैर्य देणार्या व सर्व टीकाटिप्पणींना सहन करत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सदैव झटणार्या पंतप्रधानांचे जनतेनेदेखील मनापासून आभार मानावेत, असा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे. यासाठी पक्षाच्या संकेतस्थळावर ‘थँक्स, डॉ. सिंह’ या नावाने विशेष पेज तयार करण्यात आले आहे. नागरिकांनी एका कार्डवर स्वाक्षरी करून पंतप्रधानांना सदिच्छा द्याव्यात, अशी काँग्रेसची संकल्पना आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला १० वर्षांत प्रगतीपथावर नेले. त्यांचे आभार मानण्याकरिता या कार्डवर स्वाक्षरी करावी, असे या पेजवर नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना हे कार्ड भरणे अडचणीचे ठरू नये, याबाबत काळजी घेण्यात आली आहे. यावर नागरिकांना केवळ त्यांचे नाव व ई-मेल आयडी लिहायचा आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘फेअरवेल डिनर’नंतर लगेच दुसर्या दिवशी हे पेज संकेतस्थळावर ‘अपलोड’ करण्यात आले. आकर्षक पेज : ‘थँक्स, डॉ. सिंग’ हे पेज आकर्षक दिसावे, याकरिता विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबतच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची छायाचित्रे या पेजवर आहेत. सोनिया यांच्या हातात लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ आहे.