शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना भारतरत्न द्या - काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 09:19 IST

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना  भारतरत्न द्या अशी मागणी माजी केंद्रिय मंत्री तथा काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे.

ठळक मुद्देभगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना  भारतरत्न द्या अशी मागणी काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे.तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.चंदीगड विमानतळाचे नाव बदलून भगतसिंग विमानतळ करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे.

नवी दिल्ली - देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढणारे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न द्या अशी मागणी माजी केंद्रिय मंत्री तथा काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे. यासाठी तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. भगतसिंग यांचे जन्मगाव आपल्या लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे एक खासदार या नात्याने ही मागणी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना भारतरत्न देण्यात यावे अशी मागणी मी आपणास करत आहे असे तिवारी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

चंदीगड विमानतळाचे नाव बदलून भगतसिंग विमानतळ करण्याची मागणीही तिवारी यांनी केली आहे. भाजपा आणि रा. स्व. संघाने सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवलेला असतानाच काँग्रेसने भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी यांची मागणी मोदी सरकारने फेटाळल्यास राष्ट्रवादाच्या नावावर भाजपाच्या विरोधात काँग्रेसला मोठा मुद्दा मिळू शकतो. 

23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी लाहोर कारागृहात फाशी दिली होती. देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी या तिघांनीही क्रांतिकारी लढा दिला. हा दिवस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे हे नायक प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आदर्शस्थानी आहेत. या तीन वीरांच्या हौतात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यासाठी हे तिघंही जण हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. शहीद झाले त्यावेळी भगत सिंग आणि सुखदेव हे 23 वर्षांचे आणि राजगुरू 22 वर्षांचे होते. भारत मातेची इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी, यासाठी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं.  

23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी जवळपास 7.33 वाजण्याच्या सुमारास भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली. फाशीपूर्वी भगत सिंग यांना अखेरची इच्छा विचारण्यात आली होती. त्यावेळी ते सिंग लेनीन यांचे आत्मचरित्र वाचत होते. वाचन पूर्ण करण्यासाठी सिंग यांनी कारागृह प्रशासनाकडे वेळ मागितला. यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी त्यांना फाशीची वेळ झाल्याचे सांगितले असता सिंग म्हणाले होते की, जरा थांबा. आधी एका क्रांतिकारकाला दुसऱ्या क्रांतिकारकाची भेट तरी घेऊ दे. यावेळी तिघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. फासावर जाताना तिघंही 'मेरा रंग दे बसन्ती चोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसन्ती चोला, माय रंग दे बसन्ती चोला' हे देशभक्ती गीत गात होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसBhagat SinghभगतसिंगNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा