शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CBIकडून मनीष सिसोदियांची चौकशी सुरू; केजरीवाल म्हणाले- 'मनीष 8 डिसेंबरपर्यंत तुरुंगात राहतील...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:37 IST

सीबीआयकडून दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांची उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी आज चौकशी होत आहे.

नवी दिल्ली: सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी आज सकाळी 11 वाजता सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. सीबीआयने सिसोदिया यांची चौकशी सुरू केली आहे. तत्पूर्वी, त्यांनी राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासोबत राजघाटावरील महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. या चौकशीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टोला लगावला.

संबंधित बातमी- CBI ने सिसोदियांना चौकशीसाठी बोलावले; केजरीवाल म्हणाले- 'ते आजचे भगत सिंग...'

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करत आहे. याआधीही सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या ठिकाणांवर अनेकदा छापे टाकले आहेत. त्यांची अनेकदा चौकशीही झाली आहे. मात्र, मनीष सिसोदिया यांचा दावा आहे की, आतापर्यंत सीबीआयला त्यांच्याकडून या प्रकरणाशी संबंधित काहीही मिळालेले नाही. त्यांनी पुन्हा एकदा दावा केला की हे प्रकरण पूर्णपणे खोटं आहे. ते म्हणाले की, भाजप गुजरात गमावत आहे. मला गुजरातला प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी हा सारा खेळ खेळला जात आहे. 

अरविंद केजरीवाल काय म्हणाले? दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटद्वारे भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 'गुजरातचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे. हे लोक तोपर्यंत मनीषला तुरुंगात ठेवतील. मनीषला गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाता येऊ नये, हा त्यांचा प्रयत्न आहे,' अशी टीका केजरीवाल यांनी केली. काल केजरीवालांनी मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची तुलना भगत सिंग यांच्याशी केली. 

सीबीआयकडून सिसोदियांची चौकशीमनीष सिसोदिया सीबीआयच्या मुख्यालयात पोहोचताच त्यांना एंट्री रजिस्टर देण्यात आले. त्यावर स्वाक्षरी केल्यानंतर सीबीआयचे पथक त्याच्यासोबत आत गेले. सर्व चौकशी अधिकाऱ्यांकडे प्रश्नांच्या वेगवेगळ्या याद्या आहेत. ही चौकशी थोडी लांबू शकते, असे सांगण्यात येत आहे. चौकशीदरम्यान सिसोदिया यांना इतर आरोपी आणि साक्षीदारांचे जबाबही नोंदवण्यात येणार आहेत.

काय आहे वाद?उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीतील नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्याचबरोबर 11 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तेव्हापासून हे मद्य धोरण सीबीआयच्या चौकशीत आहे.

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाCBIगुन्हा अन्वेषण विभाग