शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Manish Sisodia: 'भाजपने 200 कोटींमध्ये विकल्या काश्मिरी पंडितांच्या वेदना', मनीष सिसोदियांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 16:40 IST

Manish Sisodiya: 'चित्रपटातून कमावलेले 200 कोटी रुपये काश्मीर पंडितांच्या कल्याणासाठी द्यावेत.'

नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सिसोदिया म्हणाले की, त्यांना काश्मीरबद्दल विशेष आदर आहे, काश्मिरी लोक आवडतात. अटलजी किंवा जगमोहन यांच्या काळात जे काही घडले ते भूतकाळातील गोष्ट आहे. पण केंद्रात 8 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे, तरीही काश्मिरी पंडितांना विस्थापितांप्रमाणे का जगावे लागत आहे.

'चित्रपट यूट्यूबवर टाकावा'ते पुढे म्हणाले की, ''काश्मीरी पंडितांना वाटते की, त्यांच्या वेदना देशाने समजून घ्याव्यात. त्यांना असे वाटत नाही की, त्यांच्या वेदना 200 कोटींमध्ये विकल्या जाव्यात. चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमवला आहे, आता तो चित्रपट यूट्यूबवर अपलोड करावा, म्हणजे देशातील सर्व लोकांना तो पाहता येईल आणि काश्मिरी नागरिकांच्या वेदना सर्वांना पाहता येतील. भाजपला काश्मीर फाईल्सची चिंता आहे आणि आम्हाला काश्मीरी पंडितांची.''

'भाजपने काश्मिरींच्या वेदना विकल्या'सिसोदिया पुढे म्हणाले की, ''काश्मिरी पंडितांच्या वेदना 200 कोटींना विकण्याचे काम भाजपने केले. भाजपवाले फक्त काश्मीर फाईल्सबद्दल बोलत आहेत. पण, भाजपने आठ वर्षांत काश्मिरी पंडितांसाठी काय केले? काश्मिरी पंडितांच्या बाबतीत भाजप पूर्णपणे अपयशी ठरला आहे. चित्रपटातून कमावलेले 200 कोटी रुपये काश्मीर पंडितांच्या कल्याणकारी संस्थांना द्यावेत.'' 

'मी स्वतः चित्रपट पाहीन'मनीष सिसोदिया पुढे म्हणतात की, ''काश्मीरच्या मुद्द्यावर चित्रपट बनला, ही चांगली गोष्ट आहे. अधिवेशन झाल्यानंतर मी स्वतः 200-400 रुपयांचे तिकीट काढून हा चित्रपट पाहायला जाईल. मी यापूर्वी काश्मीरला गेलो आहे, त्या लोकांच्या वेदना पाहिल्या आहेत. मला आता पुन्हा काश्मिरी लोकांना भेटायला आवडेल. चित्रपटातून कमावलेले 200 कोटी घरे आणि वस्तुंसाठी काश्मिरी लोकांना द्यावेत. मी भाजपला विनंती करतो की, चित्रपटाने खूप धंदा केला, आता सर्वांना पाहण्यासाठी चित्रपट युट्यूबवर टाकावा'', असेही ते म्हणाले. 

टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्सAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा