शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनीच आम्हाला जमावाच्या हवाली केले; मणिपूर घटनेतील पीडितेची आपबीती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:32 IST

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढल्याच्या घटनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय.

Manipur Incident: दोन महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना मणिपूरमध्ये घडली. या घटनेनंतर संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आता घटेनेतील पीडित महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या क्रूरतेची भयावह कहाणी सांगितली आहे. पीडितांनी पोलिसांवर आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयही या प्रकरणावर जातीने लक्ष घालत असून, सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

काय म्हणाल्या पीडित महिलामीडिया रिपोर्टनुसार, 18 मे रोजी पीडित महिलांच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती, ज्यामध्ये एका महिलेवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे सांगितले होते. कांगपोकपी गावात झालेल्या हल्ल्यानंतर ते सर्व जंगलात पळून गेले, तिथून थौबल पोलिसांनी त्यांची सुटका करुन पोलिस ठाण्यात आणले. 

तीन महिला, सर्वात छोटीवर अत्याचारपीडित महिलांचे वय सुमारे 20 आणि 40 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस फिर्यादीत पीडित महिलांनी सांगिले की, आम्ही 5 जण होतो. दोन पुरुष आणि तीन महिला. आणखी एका 50 वर्षीय महिलेचेही जबरदस्तीने कपडे काढण्यात आल्याची माहिती आहे. जमावाने तीन महिलांपैकी सर्वात लहान महिलेच्या वडील आणि भावाची हत्या केल्याचा आरोप आहे.

पोलिसही त्यांच्यात सामील होतेमीडिया रिपोर्टनुसार, 20 वर्षीय अत्याचारीत पीडितेने सांगितले की, आमच्या गावावर हल्ला करणाऱ्या जमावासोबत पोलिसही होते. पोलिसांनी आम्हाला आमच्या घराजवळून उचललं आणि गावापासून थोडं दूर नेऊन गर्दीत सोडले. पोलिसांनी आम्हाला त्यांच्या ताब्यात दिले होते.

सर्व पुरुषांना मारलंरिपोर्टनुसार, पीडितेचे म्हणणे आहे की, सर्व पुरुषांना मारल्यानंतर जमावाने त्यांच्यावर अत्याचार केला. तिने सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ काढल्याचे कुटुंबातील कोणालाही माहीत नव्हते. जमावापैकी अनेकजण पीडितेच्या ओळखीचे आहेत. त्यापैकी एक तिच्याच भावाचा मित्र असल्याचे तिने सांगितले. आता या प्रकरणाची चौकशी होणार असून, लवकरच सत्य बाहेर येईल.

आतापर्यंत काय कारवाई झाली?पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केल्याची माहिती आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनीही याला दुजोरा दिला आहे. खुरियम हिरो दास असे आरोपीचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमधील घटनेचा उल्लेख केला. पीएम मोदींनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मणिपूरमधील घटनेची स्वतःहून दखल घेतली आणि राज्य आणि केंद्र सरकारला या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस