शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये 4 जणांचं अपहरण, सैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश; गोळीबारात 7 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 08:48 IST

Manipur Violence:अपहरणाची बातमी पसरताच, कुकी समुदायाच्या लोकांनी इंफाल पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यासह कांगचूप भागांत गोळीबार केला. यात दोन पोलिसकर्मचारी आणि एक महिलेसह 7 जण जखमी झाले आहेत. 

देशातील इशान्येकडील राज्य असलेल्या मणिपूरमधून सातत्याने हिसंचाराच्या घटना समोर येत आहेत. आता, येथील मैतेई समुदायाच्या लोकांनी 4 जणांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. महत्वाचे म्हणजे, यात एका सैनिकाच्या घरातील तीन जणांचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी (07 नोव्हेंबर) इंफाळ पश्चिम जिल्ह्यात घडली. यानंतर येथे पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. 

अपहरणाची बातमी पसरताच, कुकी समुदायाच्या लोकांनी इंफाल पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्यासह कांगचूप भागांत गोळीबार केला. यात दोन पोलिसकर्मचारी आणि एक महिलेसह 7 जण जखमी झाले आहेत. 

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, "मैतेई समाजाच्या लोकांनी 5 जणांचे अपहरण केले होते. यांत एका 65 वर्षीय वृद्धाचाही समावेश होता. महत्वाचे म्हणजे, या वृद्धाची सुटका करण्यात आली असून इतर 4 जणांची माहिती मिळू शकलेली नाही. यांत दो पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. 

काय म्हणतायत पोलीस? - एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, “पाच कुकी समुदायाचे लोक चुराचांदपूर वरून कांगपोकपी (दोन्ही कुकी समुदायाच्या प्रभुत्वाखालील जिल्ह्ये) येथे जात होते. ते कांगपोकपीच्या सीमेवरील इम्फाळ पश्चिम जिल्ह्यात (मैतेई बहुल जिल्हा) पोहोचले. तेव्हा येथे मैतेई समाजाच्या एका समूहाने त्यांना अडवले आणि त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, सुरक्षारक्षकाने नंतर, या पाच पैकी एका वृद्ध व्यक्तीची सुटका केली. ते जखमी झाले आहेत. मात्र इतर चार जणांची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

यानंतर, या व्यक्तीची ओळख मंगलून हाओकिप नावाने झाली आहे. त्यांना मंगळवारी सायंकाळी नागालँडमधील दीमापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीला हवाई मार्गाने रुग्णालयात पोहोचवण्यात आले. यासंदर्भात बोलताना, कांगपोकपीचे पोलीस अधीक्षक (एसपी) एम प्रभाकर म्हणाले, "आमचे चमू इतर चार जणांना वाचविण्यासाठी सर्च ऑपरेशन करत आहेत." नेंगकिम (60), नीलम (55), जॉन थांगजाम हाओकिप (25) आणि जामखोतांग (40), अशी अपहरण करण्यात आलेल्या चारही लोकांची नावे आहेत. 

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारSoldierसैनिकPoliceपोलिस