मणिपूर स्फोटात ३ ठार
By Admin | Updated: December 22, 2014 05:16 IST2014-12-22T04:10:30+5:302014-12-22T05:16:32+5:30
मणिपूरची राजधानी इम्फाळच्या खोयाथोंग भागात रविवारी सकाळी एका शक्तिशाली आयईडी (इन्टेन्सिव्ह एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस)च्या स्फोटात तीन मजूर ठार आणि चार जखमी झाले.

मणिपूर स्फोटात ३ ठार
इम्फाळ : मणिपूरची राजधानी इम्फाळच्या खोयाथोंग भागात रविवारी सकाळी एका शक्तिशाली आयईडी (इन्टेन्सिव्ह एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस)च्या स्फोटात तीन मजूर ठार आणि चार जखमी झाले. परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करून हा स्फोट घडविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आयईडीचा वापर केलेला हा बॉम्ब इम्फाळमधील बाजारपेठेजवळच्या रस्त्याच्या कडेला पेरून ठेवण्यात आला होता. परप्रांतातून मजुरीसाठी आलेले तिघे त्यात जागीच ठार झाले तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे, असे पोलिसांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एकही मजूर मणिपुरी नाही. ते खोयाथोंग येथे एका दुकानात चहा घेण्यासाठी जमले असताना हा स्फोट झाला. राज्यात या वर्षी बिगर मणिपुरी लोकांवर अनेकदा हल्ले झाले आहेत आणि त्यात नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. मुख्यमंत्री ओ. इबोबी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. (वृत्तसंस्था)