शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसमधून केलं निलंबित, मोदींबद्दलचं वादग्रस्त विधान भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 10:48 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. तसेच निलंबित करत असताना काँग्रेस पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मणिशंकर अय्यर यांनी असंसदीय अशा 'नीच' या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर आरजेडीच्या लालूप्रसाद यादवांपासून काँग्रेसच्या नेत्यांची टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानापासून हात झटकत त्यांना खडे बोल सुनावले होते.भाजपासारखी पातळी सोडून टीका करणं ही काँग्रेसची संस्कृती नाही. मणिशंकर यांनी वापरलेल्या असंसदीय भाषेबाबत त्यांना माफी मागायला हवी, असं म्हणत राहुल गांधी यांनी मणिशंकर यांना सुनावले होते. त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनीही माफी मागितली होती. मणिशंकर यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे. 'मोदीजी, तुम्ही अशा प्रकारचं धाडस दाखवू शकाल का?', असा सवालही काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेस  नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या समर्थनार्थ नेहमीच बोलणा-या लालूंनी काँग्रेस नेत्यालाच लक्ष्य केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अय्यर यांनी मोदींना नीच असं संबोधल्यानंतर लालूंनी त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं सांगितलं आहे. पाटण्यात पत्रकारांनी छेडले असता लालूप्रसाद यादव यांनी हे विधान केलं आहे.परंतु मणिशंकर अय्यर यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचंही लालूंनी सांगितलं आहे. मोदींनी उचकवल्यामुळेच मणिशंकर अय्यर यांनी हा शब्द उच्चारल्याचंही लालू म्हणाले आहेत. या देशात राजनैतिक मर्यादा, भाषा व व्याकरण फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीच्या नजरेतून पाहिलं जातंय, असं म्हणत लालूंनी मोदींवरही निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस