शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये; काँग्रेसने दिले कारवाईचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 06:07 IST

मोदी यांनी जवानांचा बळी दिल्याचाही आरोप अय्यर यांनी केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांपूर्वी ‘नीच’ असा उल्लेख केल्याने वादात सापडलेले कॉँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आपले विधान योग्यच होते, असा दावा एका लेखात केला आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मणिशंकर अय्यर यांना वरील विधानामुळे काँग्रेसने निलंबित केले होते. पुढे २0१८ मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख देशाने पाहिलेला अत्यंत शिवराळ पंतप्रधान असा केला आहे.

अय्यर यांचे तेव्हाचे विधान आम्हाला अमान्य होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई केली होती. ते त्या विधानाचे समर्थन करीत असले तरी आम्हाला ते मान्य नाही. अशी भाषा व टीका ही आमची संस्कृती नाही, त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. जनता २३ मे रोजी सत्तेतून बाहेर घालवेल, देशाने पाहिलेल्या शिवराळ पंतप्रधानाची तो अखरेचा दिवस असेल. ते सभ्य नाहीत. मी मोदी यांना ७ डिसेंबर २०१७ मध्ये काय म्हटले होते, आठवते का? मी योग्य भविष्यवाणी केली नव्हती? या पद्धतीचे घाणेरडे राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही, असे अय्यर यांनी म्हटले आहे. मोदी यांनी जवानांचा बळी दिल्याचाही आरोप अय्यर यांनी केला आहे. राजीव गांधी यांच्याविषयीच्या मोदींच्या विधानामुळे अय्यर यांनी वरील वक्तव्य केले आहे.

...हा तर दुटप्पीपणाभाजपचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी अय्यर यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, त्यांनी आपले पूर्वीचे विधान योग्य ठरविण्यासाठी खटाटोप केला. त्यांनी माफी मागितली होती. त्यांच्या पक्षानेही त्यांना निलंबित केले. असे वक्तव्य आपले हिंदी वाईट असल्याने उद्गारले गेले, असे म्हटले होते. आता मात्र आपण योग्य भविष्यवाणी केल्याचे ते सांगत आहेत. कॉँग्रेसने त्यांना गेल्याच वर्षी पक्षात घेतले. कॉँग्रेसचा दुटप्पीपणा यातून दिसून येतो.

टॅग्स :Mani Shankar Aiyarमणिशंकर अय्यरcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक