दीड महिन्यापूर्वी मंदिर हटवले, आता रातोरात बजरंगबली प्रकट झाले
By बाळकृष्ण परब | Updated: February 19, 2021 14:38 IST2021-02-19T14:35:00+5:302021-02-19T14:38:34+5:30
Hanuman Mandir News : एक हनुमान मंदिर सध्या राजकीय आखाड्यात चर्चेचा विषय ठरले आहे. दीड महिन्यापूर्वी हे मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी हटवण्यात आले होते.

दीड महिन्यापूर्वी मंदिर हटवले, आता रातोरात बजरंगबली प्रकट झाले
नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील एक हनुमान मंदिर (Hanuman Mandir) सध्या राजकीय आखाड्यात चर्चेचा विषय ठरले आहे. दीड महिन्यापूर्वी चांदनी चौकात असलेले हे मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी हटवण्यात आले होते. त्यावरून दिल्लीतील सत्ताधारी आप (AAP) आणि भाजपा (BJP) आमनेसामने आले होते. दरम्यान, आता त्याच जागेवर रातोरात बजरंगबलीचे मंदिर उभे राहिले आहे. आज सकाळी जेव्हा चांदणी चौकात त्याच ठिकाणी हनुमानाचे मंदिर पाहिले तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. आता हे मंदिर पाहण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. (Delhi chandni chowk hanuman Mandir)
चांदणी चौकात आता जे नवे हनुमान मंदिरा स्थापित करण्यात आले आहे. ते लोखंड आणि स्टिलचा वापर करून बनवण्यात आलेले आहेत. तसेच हे मंदिर आता रस्त्याच्या मध्यभागातून हटवून बाजूला उभारण्यात आले आहे.
यावर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातील येथील हनुमान मंदिर तोडण्यात आले होते. चांदणी चौकामध्ये सध्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठीच हे मंदिर हटवण्यात आले आहे. मात्र तेव्हा स्थानिक उत्तर दिल्ली महानगरपालिकेने सांगितले होते की, मंदिराला हटवण्यात आले नाही तर केवळ स्थलांतरीत करण्यात आले आहे.
चांदणी चौकासारख्या गजबजलेल्या परिसरात रातोरात मंदिर कसे उभारण्यात आले, हा एक प्रश्नच आहे.