शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

बाबो! कारच्या बॉनेटमध्ये कोंबले होते 2 कोटी रुपये, इंजिनला लागली आग अन्...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 2, 2021 14:15 IST

संबंधित आरोपी चलनी नोटा कारच्या बोनटमध्ये लपवून नेत होते. मात्र, इंजिनला आग लागल्याने त्यांनी कार थांबवली आणि बोनट उघडले, अन्...

ठळक मुद्देसिवनी जिल्ह्यातील बनहानी गावातील लोकांनी एका कारमधून 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा उडताना बघितल्या.आरोपींकडून 1.74 कोटी रुपयांच्या सुरक्षित नोटा जप्त करण्यात  आल्या आहेत. आयकर विभागालाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

सिवनी - मध्य प्रदेशातील सिवनी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री एक अजब नजारा बघायला मिळाला. सिवनी जिल्ह्यातील बनहानी गावातील लोकांनी एका कारमधून 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा उडताना बघितल्या. यानंतर कुणीतरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजीनमधून धूर निघताना पाहून कारमधील लोकांनी उतरून इंजिन तपासण्यासाठी बोनट उघडले, तेवढ्यात जळालेल्या नोटा उडून खाली पडू लागल्या.

या प्रकरणी सीवनी जिल्हा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील तीन जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 1.74 कोटी रुपयांच्या सुरक्षित नोटा जप्त करण्यात  आल्या आहेत. तसेच आरोपींनी दावा केला आहे, की ते जवळपास दोन कोटी रुपये बोनटमध्ये लपवून घेऊन जात होते.

यासंदर्भात कुराई पोलीस ठाण्याचे एसएचओ मनोज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “संबंधित आरोपी चलनी नोटा कारच्या बोनटमध्ये लपवून नेत होते. मात्र, इंजिनला आग लागल्याने त्यांनी कार थांबवली आणि बोनट उघडले. मात्र, हवा जोरात असल्याने बोनट उघडताच अर्धवट जळालेल्या नोटा रस्त्यावर उडू लागल्या. हे पाहून स्थानिक लोकांनी संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली.”  

यानंतर पोलीस घटनास्थी पोहोचण्यापूर्वीच संबंधित आरोपींनी घटना स्थळावरून पळ काढला. मात्र, हायवे पोलिसांनी त्यांना पकडले. एका स्थानिक नागरिकाने त्यांच्या कारचा नंबर नोट केलेला होता. या कारचा रजिस्ट्रेशन नंबर मुंबईचा होता. या तीनही आरोपींची ओळख झाली असून, सुनील आणि न्यास हे उत्तर प्रदेशातील जौनपूरचे आहेत तर हरिओम आजमगडचा आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवून पोलीस पुढील तपास करत आहे. 

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, ते वाराणसीहून मुंबईला सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी चालले होते. तसेच ते याच मार्गाने परतही जाणार होते. पोलिसांनी सांगिल्याप्रमाणे, आरोपींनी दावा केला आहे, की टॅक्स वाचविण्यासाठी ते अशा पद्धतीने पैसै नेत होते. ही सर्व रक्कम वाराणसीतील एका ज्वेलरची आहे. आरोपींनी दिलेल्या या माहितीवरू आता पोलीसांनी पुढील तपास सुरू केला असून आयकर विभागालाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjewelleryदागिनेGoldसोनंPolice Stationपोलीस ठाणे