शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

अटकेच्या कारणांची माहिती देणे अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:25 IST

कोणत्याही गुन्ह्याखाली अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुन्ह्याचे स्वरूप, अटकेचे कारण समजेल अशा सांगितलेच पाहिजे- सुप्रीम कोर्ट

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कोणत्याही गुन्ह्याखाली अटक केलेल्या प्रत्येक व्यक्तीला गुन्ह्याचे स्वरूप, त्याच्या अटकेचे कारण लेखी स्वरूपात आणि त्याला समजेल अशा भाषेत दिले गेले पाहिजेत, असा ऐतिहासिक निकाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालामुळे व्यक्तिस्वातंत्र्याच्या घटनात्मक संरक्षणाला बळकटी मिळेल, असे मत सरन्यायाधीश बी. आर. गवई व न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुंबईत हाय प्रोफाइल बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरण झाले होते. या खटल्यातील आरोपी मिहीर शहा विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यात न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

अटक करण्यापूर्वी किंवा लगेच नंतर अटकेची कारणे लेखी स्वरूपात अटक केलेल्या व्यक्तीला दिली पाहिजेत जेणेकरून ती अटक अवैध ठरणार नाही. ही कारणे तर्कसंगत वेळेत आणि कोणत्याही परिस्थितीत रिमांड कारवाईसाठी आरोपीला दंडाधिकारी समोर हजर करण्याच्या दोन तास आधी लेखी स्वरूपात दिली गेली पाहिजेत असे न्यायालयाने म्हटले.

५२ पानांचे निकालपत्र

न्यायालयाने आपल्या ५२ पानांच्या निकालपत्रात स्पष्टपणे नमूद करताना म्हटले की, घटनात्मक कलम २२(१) नुसार अटक झालेल्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर अटकेची कारणे सांगणे ही केवळ प्रक्रिया नसून व्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत संरक्षण आहे. तसेच आरोपीला अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर कळवावी तसेच त्याला समजेल अशा भाषेत लेखी स्वरूपात ती असावीत हा त्याचा अधिकार आहे. अटकेची कारणे कळवणे हे आयपीसी १८६० (आता बीएनएस २०२३) अंतर्गत बंधनकारक आहे, असे न्यायालयाने म्हटले.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court mandates informing arrest reasons; landmark decision for freedom.

Web Summary : The Supreme Court ruled that every arrested person must receive written arrest reasons in an understandable language. This strengthens individual freedom, ensuring reasons are provided promptly, before remand. The ruling stems from the Mihir Shah case, reinforcing constitutional rights under Article 22(1).
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस