मंदार काळे यांना कोठडी

By Admin | Updated: October 31, 2015 22:44 IST2015-10-31T22:44:42+5:302015-10-31T22:44:42+5:30

जळगाव: जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणी डॉ.मंदार काळे यांना शनिवारी न्या.संगिता शिंदे यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काळे दोन दिवसापुर्वी न्यायालयाला शरण आले होते. बालमृत्यूप्रकरणी तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर, डॉ.युदीष्टीर इंगळे, डॉ.हिरा दामले, डॉ.अभय जोशी, डॉ.स्मिता मुंडे, डॉ.उमेश वानखेडे व डॉ.मंदार काळे यांच्याविरु ध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाडी मंदार काळे यांची गरज असल्याची मागणी जिल्हा पेठ पोलिसांनी न्यायालयाकडे शनिवारी केली होती. त्यानुसार न्या.संगिता शिंदे यांनी काळे यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.हेमंत मेंडकी व आरोपीतर्फे ॲड.अकील इस्माईल यांनी काम पाहिले.

Mandar Kale to the closet | मंदार काळे यांना कोठडी

मंदार काळे यांना कोठडी

गाव: जिल्हा रुग्णालयातील बालमृत्यू प्रकरणी डॉ.मंदार काळे यांना शनिवारी न्या.संगिता शिंदे यांनी ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काळे दोन दिवसापुर्वी न्यायालयाला शरण आले होते. बालमृत्यूप्रकरणी तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एन.लाळीकर, डॉ.युदीष्टीर इंगळे, डॉ.हिरा दामले, डॉ.अभय जोशी, डॉ.स्मिता मुंडे, डॉ.उमेश वानखेडे व डॉ.मंदार काळे यांच्याविरु ध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाडी मंदार काळे यांची गरज असल्याची मागणी जिल्हा पेठ पोलिसांनी न्यायालयाकडे शनिवारी केली होती. त्यानुसार न्या.संगिता शिंदे यांनी काळे यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.हेमंत मेंडकी व आरोपीतर्फे ॲड.अकील इस्माईल यांनी काम पाहिले.

पुनम कंजरला कोठडी
जळगाव: तलवार हल्लयाप्रकरणी पुनम कंजर याला न्या.एस.जे.शिंदे यांनी ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एमआयडीसी पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले होते. सरकारतर्फे ॲड.अनिल पाटील यांनी तर आरोपीतर्फे ॲड. निलिमा नाईक यांनी काम पाहिले.

दुचाकी चोरी
जळगाव: जयकिसनवाडीतील व्यापारी राजेश सिताराम तिवारी (वय ५३) यांची अठरा हजार रुपये किमतीची दुचाकी २७ ते २८ ऑक्टोबरच्या दरम्यान राहत्या घरुन चोरी झाली आहे.याबाबत शहर पोलीस स्टेशला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Mandar Kale to the closet