शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध मंदा म्हात्रे यांचे उद्गार : शिरवणेमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:25+5:302015-03-14T23:45:25+5:30
नवी मुंबई : सिडको नोडमधील मोडकळीस आलेली घरे व प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास यश आले आहे. शहरातील इतर सर्व प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले.

शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध मंदा म्हात्रे यांचे उद्गार : शिरवणेमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा
न ी मुंबई : सिडको नोडमधील मोडकळीस आलेली घरे व प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास यश आले आहे. शहरातील इतर सर्व प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे मत आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले. शिरवणेमध्ये डॉ. राजेश पाटील, काशिनाथ पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंदा म्हात्रे म्हणाल्या की, सिडको वसाहतीमधील वाढीव चटई क्षेत्राचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. भाजपा सरकारने तत्काळ याविषयी अध्यादेश काढून नागरिकांना दिलासा दिला आहे. गावठाणांसाठी क्लस्टर योजनेचा प्रश्नही सोडविण्यात आला आहे. दिवाळे गावातील जेीसाठी २ कोटी १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरातील जे प्रश्न शासनदरबारी प्रलंबित आहेत ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. डॉ. राजेश पाटील यांनीही मंदाताईंनी आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. शासनाच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविता येतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)शिरवणेमधील भाजपा मेळाव्याला आमदार मंदा म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. राजेश पाटील, काशिनाथ पाटील, धीरज भोईर, मंगेश गायकवाड, दिलीप तिडके, रामचंद्र घरत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. फोटो१४बीजेपी नावाने आहे.