शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आवडीची व्यक्ती मुख्यमंत्री व्हावी म्हणून त्याने देवाला वाहिली जीभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 14:48 IST

पाच राज्यातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे.  निवडणुकीत विजय मिळावा यासाठी नेते आणि कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून काम करत आहे.

ठळक मुद्दे पाच राज्यातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे.पल्या आवडीची व्यक्ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान व्हावी, असे साकडे देवाला घालत एका व्यक्तीने मंदिरात आपली जीभ कापून वाहिल्याचे समोर आले आहेआपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळू दे, असे साकडेही या अवलियाने देवाला घातले

हैदराबाद - पाच राज्यातील विधानसभा निवडुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या देशातील राजकीय वातावरण तापलेले आहे.  निवडणुकीत विजय मिळावा यासाठी नेते आणि कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून काम करत आहे. दरम्यान, आपल्या आवडीची व्यक्ती आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान व्हावी, असे साकडे देवाला घालत एका व्यक्तीने मंदिरात आपली जीभ कापून वाहिल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळू दे, असे साकडेही या अवलियाने देवाला घातले. तेलंगणा राज्यातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. महेश असे या जीभ कापून घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा बुधावारी श्रीनगर कॉलोनीमधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये आला. इथे पूजा केल्यानंतर तो गुडघ्यांवर बसला. त्यानंतर त्याने आपली जीभ कापून ती देवासमोर ठेवलेल्या दानपत्रात टाकली. हा प्रकार पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या अवलियाला रुग्णालयात दाखल केले.या व्यक्तीच्या खिशामधून एक पत्र सापडले आहे. तेलंगणा आणि तामिळनाडू या दोन तेलुगू राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या आवडीचे व्यक्ती बनावेत, असे मला वाटते. तसेच राजकारणामध्ये मोठे पद मिळावे, अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या आवडीच्या व्यक्तीने मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर मला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, असा नवस चिठ्ठीमध्ये लिहून त्याने आपली जीभ कापली. दरम्यान, या तरुणाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.   

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018TelanganaतेलंगणाAndhra Pradeshआंध्र प्रदेशElectionनिवडणूक