धक्कादायक! भररस्त्यात त्याचा आई-वडील, पत्नी-मुलावर गोळीबार; स्वतःचं संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 15:48 IST2019-08-16T15:47:42+5:302019-08-16T15:48:15+5:30
कर्नाटकातल्या चामराजनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! भररस्त्यात त्याचा आई-वडील, पत्नी-मुलावर गोळीबार; स्वतःचं संपवलं आयुष्य
बंगळुरूः कर्नाटकातल्या चामराजनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चामराजनगरमधल्या गुंडलुपेटेजवळ एका व्यक्तीनं पूर्ण कुटुंबीयांना संपवलं. कुटुंबीय बाहेर फिरण्यासाठी निघालं होतं. त्यातील एका व्यक्तीनं कुटुंबातील चार सदस्यांवर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. त्या व्यक्तीनं पहिल्यांदा आई-वडील, नंतर पत्नी आणि मुलावर गोळीबार केला, त्यानंतर स्वतःवर गोळी झाडली. सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
पोलिसांना हा प्रकार समजताच ते लागलीच घटनास्थळी पोहोचले. कुटुंबीयांतील सर्वाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. ऊटी रोडवर ही घटना घडली असून, म्हैसूरमधल्या ओमप्रकाशनं कुटुंबीयांना संपवलं आहे. म्हैसूरपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडलुपेटेतल्या नंदी लॉजमध्ये त्यानं एक रुम बुक केली होती. गुरुवारी तो पूर्ण कुटुंबीयांसह इथे फिरण्यास आला होता. ओमप्रकाशनं लॉजपासून कुटुंबीयांना काही अंतरावर दूर नेत त्यांच्यावर स्वतःजवळ असलेल्या बंदुकीतून गोळीबार केला, भर रस्त्यात ही गोळीबाराची घटना घडल्यानं सर्वच अचंबित झाले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची काही जणांनी पोलिसांना सूचना दिली.
घटनास्थळावर सर्वच सदस्यांचा मृत्यू झाला होता. हत्येमध्ये वापरण्यात आलेलं पिस्तूल पोलिसांनी जप्त केलं आहे. हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे.