शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
2
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
3
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
4
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
5
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
6
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
7
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
8
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
9
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
10
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
11
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
12
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
13
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
14
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
15
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
16
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
17
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
18
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
19
कमाल! नोकरीसोबतच घराचीही जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
20
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
Daily Top 2Weekly Top 5

भारीच! 'तो' गायत्री मंत्र म्हणत होता अन् डॉक्टरांनी काढला 'ब्रेन ट्यूमर'; 4 तास चालली सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 16:05 IST

Man recites gayatri mantra as doctor removes his brain tumor : ब्रेन ट्यूमर काढण्यासाठी चार तास सर्जरी करण्यात आली. मात्र सर्जरी दरम्यान रुग्ण गायत्री मंत्राचा जप करत होता.

नवी दिल्ली - राजस्थानच्या जयपूरमध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. ब्रेन सर्जरी दरम्यान एक रुग्ण गायत्री मंत्र म्हणत असल्याचं समोर आलं आहे. सीनियर न्यूरोसर्जन डॉ. केके बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली जयपूरच्या नारायण रुग्णालयात न्यूरो सर्जरी टीमला मोठं यश आलं आहे. 57 वर्षीय रिधमल राम यांच्या मेंदूतील ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आला आहे. या रुग्णाला सतत चक्कर येत असे. या काळात त्यांचा आवाजदेखील बंद होत असे. याबाबत वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांना ब्रेन ट्यूमर असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. 

ब्रेन ट्यूमर काढण्यासाठी चार तास सर्जरी करण्यात आली. मात्र सर्जरी दरम्यान रुग्ण गायत्री मंत्राचा जप करत होता. जयपूरच्या नारायण रुग्णालयाच्या जोनल क्लिनिकल डायरेक्टर डॉ. माला ऐरुन यांनी चार तासाच्या सर्जरीमध्ये एक हाय एंड ऑपरेटिंग मायक्रोस्कोपचा समावेश असल्याचं म्हटलं आहे. अशा प्रकराची सर्जरी ही देशातील फारच कमी ठिकाणी केली जाते. तसेच ही करण्यासाठी उच्च स्तरीय तज्ज्ञांची आवश्यकता असते. चुरूचे रहिवासी असलेल्या रिधमल राम यांना वारंवार चकर येत होती. 

चाचण्या केल्या असता रिपोर्टमध्ये ब्रेनच्या स्पीच एरियामध्ये ब्रेन ट्यूमर असल्याचं समोर आलं. यामुळे या भागात थोडी जरी इजा झाली असती, तरी या व्यक्तीची बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमताच निघून गेली असती. त्यासाठी सर्जरी सुरू असतानाही रुग्ण नीट बोलत आहे आणि त्याला सर्व नीट ऐकू येत आहे हे महत्त्वाचं होतं. म्हणूनच त्यांना गायत्री मंत्राचा जप करायला सांगितला होता. न्यूरो सर्जरी करणाऱ्या टीमने ब्रेन ट्यूमरची यशस्वी सर्जरी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही महिन्यांपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली होती. एका रुग्णाची ओपन ब्रेन सर्जरी करायची होती. मात्र ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला झोपायची परवानगी नव्हती अशा परिस्थितीत डॉक्टरांनी अनोखी शक्कल लढवली. रुग्णाला त्याचा आवडता टीव्ही शो 'बिग बॉस' आणि हॉलिवूड चित्रपट 'अवतार' दाखवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्ण या गोष्टी लॅपटॉपवर पाहत असेपर्यंत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ओपन ब्रेन शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाच्या मेंदूत डाव्या बाजूला असलेल्या प्रीमोटर क्षेत्रातील ग्लिओमा काढून टाकायचा होता. यासाठी डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रिया संपेपर्यंत लॅपटॉपवर बिग बॉस आणि अवतार सिनेमा दाखवला होता.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरRajasthanराजस्थानIndiaभारत