शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आयुष्यभराची कमाई ५ लाखांची रक्कम वाळवीने केली मातीमोल, आंध्रातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:36 IST

Man Loses Life Savings As Termites Eat Cash Worth Rs 5 Lakh Stored in Iron Trunk : हा प्रकार आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मायलावरम या गावी घडला. ५०० व २०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रोख रक्कम सदर व्यापाऱ्याने ठेवली होती.

अमरावती : आंध्र प्रदेशमधील एका व्यापाऱ्याने आपली आयुष्यभराची कमाई असलेली पाच लाख रुपयांची रोख रक्कम अनेक महिन्यांपूर्वी बँकेऐवजी घरात एका पेटीमध्ये सांभाळून ठेवली होती. मात्र पेटीतील नोटा वाळवीने खाल्ल्याने आता मातीमोल ठरल्या आहेत. हा प्रकार आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मायलावरम या गावी घडला. ५०० व २०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रोख रक्कम सदर व्यापाऱ्याने ठेवली होती. बिजली जमालय्या असे त्याचे नाव असून, तो डुकरांचा व्यापार करतो. त्यातून होणारी कमाई तो बँकेत ठेवण्याऐवजी घरातील एका पेटीत ठेवत असे. त्यातून जमा झालेल्या पाच लाख रुपयांतून या व्यापाऱ्याला नवे घर बांधायचे होते. नोटांना वाळवी लागून त्या मातीमोल ठरल्याचे पाहताच बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याला प्रचंड दु:ख झाले. त्याने या खराब नोटा गावात रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना वाटून टाकल्या. लहान मुलांच्या हातात इतकी मोठी रक्कम बघून गावातील मंडळींनी पोलिसांना ही माहिती कळविली. वाळवीने खाल्लेल्या या नोटा बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याने मुलांना दिल्या असे  चौकशीतून निष्पन्न होताच सारा प्रकार उजेडात आला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशMONEYपैसा