शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारांसाठी अशीही भरती; पगार महिना 15 हजार, काम रोज किमान एक चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 15:08 IST

महिना 15 हजार रुपये पगारावर चोरीसाठी नेमले सहा तरुण

जयपूर: एखादी कंपनी दहावी, बारावी, पदवीपर्यंतचं शिक्षण झालेल्या तरुणांना रोजगार देते, हे तुम्ही अनेकदा वाचलं असेल. कंपनीतील कामाचं स्वरुप आणि पगार या गोष्टी नोकरीची संधी स्वीकारताना महत्त्वाच्या असतात. मात्र जयपूरमध्ये एका 21 वर्षांच्या तरुणानं 6 बेरोजगारांना एका वेगळ्याच कामासाठी नोकरीला ठेवलं होतं. हा तरुण 6 जणांना महिन्याला 15 हजार पगार द्यायचा. त्या बदल्यात या तरुणांना दिवसाला एक चोरी करावी लागायची. पोलिसांनी या म्होरक्यासह त्याच्या 6 'कर्मचाऱ्यांना' अटक केली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचं सामान जप्त करण्यात आलं आहे. जयपूरमधील एक तरुण बेरोजगारांना चोरी करण्यासाठी चक्क नोकरी देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या व्यक्तीचं नाव आशीष मीणा असं आहे. त्यानं 6 जणांना नोकरीवर ठेवलं होतं. त्या 6 जणांना दिवसाला किमान एक चोरी करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना महिन्याकाठी 15 हजार रुपये इतका पगार दिला जायचा. पोलिसांनी या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून मोबाईल, सोन्याची चेन, मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. पोलिसांनी पकडलेली टोळी सर्कल एरिया, शिवदासपुरा, खो नागोरिया, सनागनेरमध्ये खूप सक्रिय होती. या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि चोरी झालेल्या फोनच्या मदतीनं पोलीस या टोळीपर्यंत पोहोचले. ही संपूर्ण टोळी प्रताप नगरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. त्यानंतर छापा टाकून पोलिसांनी सातही जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यांच्याकडून 33 मोबाईल, 1 लॅपटॉप, 2 सोन्याच्या चेन, 4 मोटारसायकल जप्त केल्या. चोरी करणारे 6 तरुण सर्व सामान आशिषकडे जमा करायचे. तो या सर्व वस्तू विकून 6 तरुणांना पगार द्यायचा. या 6 तरुणांना दिवसातून एक चोरी करावीच लागायची. अन्यथा आशिष त्यांचा एक दिवसाचा पगार कापायचा. 

टॅग्स :ThiefचोरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी